आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा स्वराज 7 दिवसांच्या युरोप दाैऱ्यावर; संबंध बळकट करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सात दिवसांच्या युरोपीय देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. इटली, फ्रान्स, लक्झम्बर्ग, बेल्जियम इत्यादी  देशांचा त्या दौरा करतील. या दौऱ्यात सुषमा स्वराज चार युरोपीय देशांसोबतचे सामरिक तसेच व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर देणार आहेत. 

  
युरोपीय संघाच्या पदाधिकाऱ्यांशी स्वराज ब्रुसेल्सच्या दौऱ्यात चर्चा करतील. युरोपीय संघ व भारत यांच्यातील व्यापारी कराराच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल. सुषमा यांचा हा युरोपीय दौरा १७ ते २३ असा राहणार आहे. या दौऱ्यामुळे जागतिक, क्षेत्रीय, द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल. दाैऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या इटलीला जातील. त्यानंतर १८ जून रोजी त्या फ्रान्सच्या दोन दिवसीय भेटीवर जातील. भारत-फ्रान्स यांच्यातील  सामरिक संबंधाला यंदा २० वर्षे पूर्ण होतील. १९-२० जून दरम्यान त्यांचा लक्झम्बर्गचा दौरा असेल. बेल्जियमलाही त्या भेट देणार आहेत. 

 

भारतीयांशी संवाद  : सुषमा स्वराज या दौऱ्यात ‘वातावरण बदल, शांतताा व सुरक्षा : कृतीशील होण्याची गरज’ या विषयावरील परिसंवादात त्या  प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर युरोपीय संसदेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात देखील त्या सहभागी होतील. त्यानंतर भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत.   

 

बातम्या आणखी आहेत...