आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Talking About Man Ki Baat, Neerav And Rafael Spoke On The Occasion: Rahul Gandhi

‘मन की बात’ मधून नीरव, राफेल सौद्यावर बोला : राहुल गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  पीएनबी बँकेतील घोटाळा, राफेल सौदा आणि नीरव मोदी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. त्यांना काय वाटते हे ‘मन की बात’मधून ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पंतप्रधानांनी मौन सोडावे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  


मोदीजी गेल्या महिन्यात तुम्ही माझ्या सल्ल्याकडे कानाडोळा केला. सध्या लोकांना तुमच्याकडून काय ऐकायला आवडेल हे माहितेय ? १- नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले आणि त्याने पलायन कसे केले ? २- ५८ हजार कोटी रुपयांचा राफेल सौदा यावर तुम्ही बोलले पाहिजे. दागिन्यांचा व्यापारी नीरव मोदीने बँकेला कोट्यवधींचा चुना लावून तो फरार झाला आहे. त्याला सत्तेवर असलेल्यांनीच संरक्षण दिले आहे. यावर पंतप्रधानांनी बोलले पाहिजे, असे राहुल यांनी सांगितले.  


गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजीच्या मन की बातसाठी मी तुम्हाला देशातील अत्याचार थांबवणे, डोकलाममधून चिनींना बाहेर काढणे, रोजगार या विषयावर बोलण्याचे आवाहन केले होते. तुम्ही प्रतिसाद दिला नाही, असे राहुल यांनी सांगितले.  


२४ पासून कर्नाटक दौऱ्यावर 

राहुल गांधी २४ फेब्रुवारी कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तीनदिवसीय दौरा आखला आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाडमध्ये जाणार आहेत. त्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल बसने प्रवास करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राहुल गांधी मंदिर, दर्ग्यावरही जातील. 

बातम्या आणखी आहेत...