आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लोकांची टीम तयार करते जुमले, मोदींनी भाषणात उल्लेख करताच होतात लोकप्रिय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बंगळुरु येथील प्रचार सभेत एक नवा जुमला टॉप (TOP) फेकला होता. याचा अर्थ होता टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो. या तिन्ही शब्दाच्या अद्याक्षरापासून TOP हा शब्द तयार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात नेहमीच अशा शब्दांचा प्रयोग करत विरोधकांवर हल्ला करतात. असे छोटे आणि ठळक शब्द लगेच लोकांच्या लक्षात राहातात आणि त्यांच्या ओठांवर रुळतात. पंतप्रधान असे शब्द आणतात कुठून याचा शोध DivyaMarathi.Com ने घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात समोर आले की एक रिसर्च टीम आहे जी या एक्रोनिम्सची (अद्याक्षरांपासून तयार होणारे शब्द) निर्मिती करते.  

 

कोण आहे या टीममध्ये? 

 

1) जगदीश ठक्कर, पीआरओ 
- जगदीश ठक्कर पीएमओचे पीआरओ आहेत. मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा पासून ते त्यांचे पीआरओ आहेत. ठक्कर हे मोदींचे विश्वासू मानले जातात आणि त्यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात. 

 

2) यश गांधी आणि नीरव के. शहा 
- दोघेही गुजराती आहेत आणि पीएमओमध्ये रिसर्च ऑफिसर आहेत. यश गांधी आणि नीरव शहा हे पंतप्रधानांच्या भाषणांपासून सर्व विषयांवर रिसर्च करतात आणि त्यांना इनपूट देतात. पंतप्रधानांचे ट्विटर आणि फेसबुक देखील हे दोघे पाहातात. 


3) हिरेन जोशी (ओएसडी-आयटी)
- जोशी आधी पत्रकार होते. आता ते पीएमच्या कोअर टीममध्ये आहेत. मोदींना भाषणासाठी ते असे मुद्दे देतात जे जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधीत आहेत आणि लवकर प्रसिद्ध होतील. 


4) प्रतीक दोषी (ओएसडी- रिसर्च अँड स्ट्रॅटिजी)
- प्रतीक यांचे शिक्षण नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथे झाले आहे. 2007 पासून ते मोदींसोबत आहेत. मोदी सरकारच्या स्ट्रॅटिजिक इनिशेटिव्हसाठी ते काम करतात. मोदींच्या भाषणात कोणते मुद्दे असले पाहिजे यासाठीही ते रिसर्च करतात. 

 

लोकांच्या ओठांवर रुळणारे PM चे प्रसिद्ध एक्रोनिम 
-  GST:गुड अँड सिंपल टॅक्स असे हे नाव होते. मोदींनी त्याला ग्रोइंग स्ट्रॉन्गर टुगेदर म्हटले होते. 
- SCAM: उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान सपा, काँग्रेस, अखिलेश यादव आणि मायावती यांच्या नावातील अद्याक्षरे घेऊन SCAM (घोटाळा) हा शब्द तयार करण्यात आला होता. 

- BHIM: भारत इंटरफेस फॉर मनी. असा याचा अर्थ आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात याला डिजिटल ट्रांजेक्शनसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशी जोडून त्याला 'भीम अॅप' केले. 

- VIKAS: यूपी निवडणूकतीच मोदींनी वीज, कायदा आणि रस्ता (सडक) याच्याशी विकास हा शब्द जोडला होता.

- ABCD: काँग्रेसवर टीका करण्यासाठी मोदींनी आदर्श, बोफोर्स, कोळसा आणि डी फॉर दामाद अशी शब्दांची एबीसीडी तयार केली होती.


मोदी समोर गर्दीकडे पाहून बोलू लागले म्हणजे ते लिखित भाषण वाचत नाही 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लिखित भाषणातील प्रत्येक मुद्दा वाचतीलच असे नाही, असे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका युवकाने सांगितले. मोदी जेव्हा समोर पाहून बोलत असतात तेव्हा समजून घ्यायचे की ते लिखित भाषण वाचत नाही. ते डाव्या आणि उजव्या बाजूला पाहून बोलत असतील तर ते टेलिप्रॉम्पटरवर वाचून बोलत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...