आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Idea Of The Government To Provide A Solution To The Petrol And Diesel Prices

पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर दिलासा देण्याच्या पर्यायावर सरकारचा विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत असल्याचा दावा पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. वास्तविक नेमक्या कोणत्या पर्यायावर सरकारचा विचार सुरू आहे याची माहिती त्यांनी दिलेली नाही.

 

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती १० डॉलर प्रती बॅरलने वाढल्यास आयात बिलामध्ये आठ अब्ज डॉलर (५४,००० कोटी रुपये)ची वाढ होण्याचा अंदाज “एसबीआय रिसर्च’ने व्यक्त केला आहे.  मार्च २०१७ पर्यंत तेल ५३ डॉलर प्रती बॅरलवर गेले होते. त्यामुळे बिलात २० टक्क्यांची वाढ झाली होती. या वर्षी कच्चे तेल ७० डॉलरवर पोहोचले आहे.  


कच्चे तेल सध्या ८० डॉलरच्या जवळपास आहे. या अहवालात मार्च २०१९ पर्यंत ते ९० डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वर्ष २०१८-१९ साठी सरासरी किंमत ८३.९ डॉलर प्रती बॅरल असेल जी २०१७-१८ मध्ये ७३.६ डॉलर होती. जर या वर्षी जूनमध्ये कच्चे तेल ९० डॉलरच्या वर गेले तर मार्च २०१९ पर्यंत १०० डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. अशा वेळी २०१८-१९ मध्ये सरासरी किंमत ९३ डॉलर असेल. यामुळे  जीडीपीमध्ये ०.३१ टक्के घट होईल, महागाई ०.५८ टक्के आणि आर्थिक तूट ०.४ टक्के वाढेल.  


सरकारने पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क तत्काळ कमी करण्याची मागणी उद्योगाने केली आहे. कच्चे तेल महागल्याने रुपया कमजोर होईल आणि आयात बिलात 
वाढ होणार असल्याचे फिक्की आणि असोचेमने म्हटले आहे. पतधोरणात व्याज दर वाढल्यास खासगी गुंतवणूकही कमी होईल. त्यामुळे सरकारने पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क तत्काळ कमी करायला हवे. तसेच केंद्राने राज्यांशी चर्चा करून पेट्रोलियम उत्पादने जीएसटीअंतर्गत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणीही उद्योग जगताने केली आहे.

 

पेट्रोल ३३ पैसे, तर डिझेल २५ पैसे महाग 
सोमवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ७६.५७ रुपये आणि डिझेल ६७.८२ रुपये झाली. रविवारच्या तुलनेत पेट्रोल ३३ पैसे आणि डिझेल २५ पैसे महाग झाले. १४ मेपासून आठ दिवसांत पेट्रोलच्या दरात १.९४ रुपये आणि डिझेलच्या दरात १.८९ रुपयांनी वाढ झाली. 

 

२०१८-१९ मध्ये चालू खाते तोटा २.५ टक्क्यांपर्यंत
कच्चे तेल महाग झाल्यास २०१८-१९ मध्ये चालू खाते तोटा वाढून जीडीपीच्या २.५ टक्के होऊ शकतो. मागील वर्षी हे सुमारे १.७ टक्के होते. चालू खाते तोटा एक अब्ज डॉलरने वाढल्यास रुपयाची किंमत सुमारे ३० पैसे कमी होेते. एक अब्ज डॉलर पोर्टफोलिओ गुंतवणूक आल्यास रुपया २६ पैसे मजबूत होतो.

 

 पुढील स्लाईडवर पहा, ३ वर्षांत ३६% वाढले भारताचे कच्चे तेल आयात बिल

 

 

बातम्या आणखी आहेत...