आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा वर्षात सर्वाधिक महागाई, औद्योगिक उत्पादनातही घसरण; नोव्हेंबरमध्ये महागाई दर 4.88%

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- किरकोळ महागाईने सव्वा वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. औद्योगिक उत्पादन वृद्धिदर (आयआयपी) तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. नोव्हेंबरमध्ये महागाई दर ४.८८% राहिला. तो ऑगस्ट २०१६च्या ५.०५% नंतर सर्वाधिक आहे. रिझर्व्ह बँकेचे महागाई दराचे उद्दिष्ट ४% ठेवले आहे. दुसरीकडे, ऑक्टोबरमध्ये आयआयपी दर २.२% राहिला. हा जुलैनंतर १ टक्क्याने कमी आहे.

 

का वाढली महागाई?

- भाजीपाला २२.४८% तर फळे ६.१९% महागली आहेत.

- एका वर्षात कच्चे तेल सुमारे २८% पर्यंत महागले.

- ४८ लाख कर्मचाऱ्यांच्या एचअारए वाढीचाही परिणाम.

 

आयआयपीत घसरण

मॅन्युफॅक्चरिंग घटून २.५%, ऑक्टो. २०१६ मध्ये त्यात ४.८%, सप्टेंबर २०१७ मध्ये ३.५८% वाढ. - खाणक्षेत्रातील वाढही ०.२% झाली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढ... 

बातम्या आणखी आहेत...