आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रक्तचाचणीमुळे पाच वर्षे अाधीच कळणार कोणत्या कर्करोगाचा धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात आजवर कर्करोगाची खात्री करून घेण्यासाठी शरीरात असलेल्या गुणसूत्रांची तपासणी केली जात असे. परंतु आता लवकरच रक्ताच्या एका तपासणीमुळे पाच वर्षे अाधीच सुस्थितीतील रुग्णास कोणत्या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता आहे, हे आधीच समजेल. उदा. रुग्णास डोळ्याचा कर्करोग होईल की स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे, हे समजू शकेल. या तपासणीचे नाव “सायटो जेनेटिक अॅनालिसिस’ असे आहे. ज्या रुग्णांस कर्करोग होण्याचा धोका असेल तो आधीच सावध होऊ शकतो. रक्ताच्या तपासणीचे हे तंत्र देशातील वाढत्या कर्करोगास आळा घालण्यास उपयुक्त ठरेल.

 

या तपासणीसाठी महागड्या किंवा उच्च प्रतीच्या यंत्राची गरज पडणार नाही. मग रक्ततपासणीचे तंत्र आणि शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास क्रोमोझोमची बाइंडिंग करता आली पाहिजे. त्याच्या विशेष ओळखीनुसारच ते ओळखणे आवश्यक आहे. डीएससीआयच्या तंत्रज्ञाना हे तंत्र शिकवण्यासाठी मी येथे येतो.

- डॉ. एस. पाठक, शास्त्रज्ञ, टेक्सास विद्यापीठ

 

एक आठवड्यात तपासणीचा अहवाल
अमेरिकेत ही तपासणी करण्यासाठी लोकांना १२०० डॉलर द्यावे लागतात. रक्ताच्या तपासणीचा अहवाल येण्यास एक आठवड्याचा कालावधी लागतो. डीएससीआयचे संचालक डॉ. आर. के. ग्रोवर यांनी सांगितले, शुल्क आकारणीवर निर्णय सरकार घेईल. मात्र, आमच्याकडे रुग्णांची नोंदणी दोन प्रकारे होते. पहिली नोंदणी सर्वसाधारण असते. त्यात सुविधा मोफत असते. दुसरी नोंदणी खासगी असते.

 

> आमची प्रयोगशाळा  टेेक्सास विद्यापीठाचे कार्यकारी संचालक अँडरसन कॅन्सर सेंटरशी संलग्न आहे. तपासणीचे हे तंत्र येथेही सुरू व्हावे, यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. प्रशिक्षण सत्र घेण्यात येत आहेत.

  - डॉ. आरके ग्रोवर,  संचालक , दिल्ली स्टेट कॅन्सर संस्था.

 

> कर्करोग वेगाने वाढतोय 

२५ लाख कॅन्सरपीडित देशभरात

- ७ लाख प्रतिवर्ष नवे कर्करोग रुग्ण आढळतात. ५ लाख रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, क्रोमोझोम क्रमांक तुटण्याने कोणता कॅन्सर हे कळेल.. 

 

 

बातम्या आणखी आहेत...