आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप 100 कंपन्यांचे मूल्य 39 वर्षांत 39 लाख कोटी रु. वाढले; टीसीएसचे बाजार भांडवल सर्वात जास्त वाढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील अव्वल १०० कंपन्यांचे मूल्य ५ वर्षांत ३८.९ लाख कोटी रुपये वाढले आहे. आतापर्यंतचा हा विक्रम अाहे. अव्वल १० कंपन्यांच्या समभागांतून गुंतवणूकदारांनी पाच वर्षांत १५ लाख कोटी रुपये जमवले. २०१२ ते २०१७ दरम्यान संपत्ती निर्मितीत टीसीएस पहिल्या क्रमांकावर आहे. एचडीएफसी बँक व मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

 

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी शुक्रवारी एक अहवाल जारी केला. फर्मचा हा २२ वा वेल्थ क्रिएशन अहवाल आहे. अभ्यासात ज्यांचे बाजार भांडवल बेंचमार्क सेन्सेक्सच्या तुलनेत सर्वात जास्त राहिले, अशा अव्वल १०० कंपन्यांचा यात समावेश केला आहे.  


मोतीलाल ओसवाल ग्रुपचे सहसंस्थापक रामदेव अग्रवाल म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या उद्योगाचा भाग बनलेल्या कंपन्यांची ओळख होणे गुंतवणुकीसाठी गरजेचे आहे. या कंपन्यांचे व्यवस्थापन वेगवान विकासावर भर देते. स्पष्ट धोरण आणि उच्च विकासाची भावना जोपासणाऱ्या कंपन्यांचा दीर्घ कालावधीपर्यंत नफा कायम राहतो.  

 

टॉप-१० मध्ये इंडियन ऑइल एकमेव सरकारी कंपनी 
बाजार भांडवलमध्ये वाढ दाखवणाऱ्या अव्वल १० कंपन्यांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पाेरेशन(आयओसी) एकमेव सरकारी कंपनी आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान तिचे बाजार भांडवल १.२ लाख कोटी रु. वाढल.े 

 

 

५ वर्षांत ३१ पट वाढले अजंता फार्माचे मार्केट कॅप 
सन २०१२ ते २०१७ दरम्यान अजंता फार्माचे बाजार भांडवल ५०० कोटी रुपयांवरून ३१ पट (वार्षिक ९३%) वाढून १५,५० कोटी रुपये झाले. आरबीएलचे बाजार भांडवल २३ पट व बालाजी फायनान्सचे १५ पट वाढले आहे.  

 

एशियन पेंट्स २२ वर्षांपासून सलग अव्वल कंपन्यांमध्ये

  एशियन पेंट्स २२ वर्षांपासून अव्वल वेल्थ क्रिएटर कंपन्यांमध्ये आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या अव्वल १० कंपन्यांमध्ये ८ कंपन्यांचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. यामध्ये टायटन, एचडीएफसी बँक व कोटक महिंद्राचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...