आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढली, 101 अब्जाधीशांची संपत्ती जीडीपीच्या 15% - रिपोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहवालात देशातील गरीब-श्रीमंतांमधील वाढत्या अंतराला सरकारी धोरण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (प्रातिनिधीक फोटो) - Divya Marathi
अहवालात देशातील गरीब-श्रीमंतांमधील वाढत्या अंतराला सरकारी धोरण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (प्रातिनिधीक फोटो)

नवी दिल्ली- भारतातील असमानता सलग तीन दशकांपासून वाढत आहे. यातील फरक इतका वाढला आहे की, देशातील अब्जाधीशांची संपत्ती देशाच्या जीडीपीच्या १५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडील संपत्ती जीडीपीच्या १० टक्क्यांच्या बरोबरीत होती. ऑक्सफॅम इंडियाने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सरकारी धोरणामुळेच श्रीमंतांची श्रीमंती आणि गरिबांची गरिबी वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताचा जीडीपी २.६ लाख कोटी डॉलर म्हणजेच सुमारे १६८ लाख कोटी रुपयांचा आहे. २०१७ मध्ये येथील अब्जाधीशांची संख्या (६,५०० कोटींपेक्षा जास्त नेटवर्थ असणारे) १०१ होती.  


भारत जगातील सर्वाधिक असमानता असलेला देश असल्याचेही इंडिया इनइक्वॅलिटीज अहवाल २०१८ मध्ये नमूद करण्यात आले आहे. येथील असमानता उत्पन्न, खर्च आणि संपत्ती अशा अनेक बाबतीत आहे. आधीपासून ज्या क्षेत्रात धर्म, जाती आणि क्षेत्रीय आधारावर फूट पडलेली आहे अशा क्षेत्रात श्रीमंत-गरीब यांच्यातील अंतर वाढत असल्याची चिंता असल्याचे अहवालाचे लेखक प्रो. हिमांशू यांनी म्हटले आहे. जास्त उत्पन्न मिळवणाऱ्यावर जास्त कर लावण्यात यावा, हा यासाठीचा एकमेव उपाय असल्याचेही ते म्हणाले. संपत्तीवरील कर पुन्हा लागू करण्यात यावा तसेच परंपरेने मिळालेल्या संपत्तीवरही कर लावण्यात यावा. हा पैसा गरिबांच्या आरोग्य, शिक्षण आणि पोषणावर खर्च करण्यात यावा. सुमारे महिन्यापूर्वी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक सुरू होण्याच्या आधी ऑक्सफॅम यांनी हा अहवाल जारी केला होता. या अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात जेवढी संपत्ती उत्पादित झाली त्यातील ७३ टक्के भाग अति श्रीमंतांकडे गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने वाढ झाली असल्याने मोजक्या लोकांच्या संपत्तीतही तेजीने वाढ झाली आहे.

 

उदारीकरणाचा कामगाराऐवजी श्रीमंतांना फायदा 
- १९९१ मध्ये सुरू झालेले आर्थिक उदारीकरणामुळे प्रमुखपणे असमानता वाढली आहे. कामगारांपेक्षा जास्त फायदा श्रीमंतांना होईल, असेच धोरण सरकारने आखले. कुशल कारागिरांनाच प्राधान्य देण्यात आले. 
- १९८० च्या दशकात भारतातील गरीब-श्रीमंत यांच्यातील अंतर जवळपास स्थिर होते. मात्र, १९९१ नंतर यातील अंतर वाढण्यास सुरुवात झाली आणि २०१७ पासून आतापर्यंत हे उच्चांकावर पोहोचले आहे.

बातम्या आणखी आहेत...