आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Is A Need For A Widespread Typical Tax For Annihilation Of Terrorism: India

दहशतवादाच्या उच्चाटनासाठी व्यापक व्यूहरचना हवी : भारत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय दहशतवादामुळे जागतिक शांतता तसेच सुरक्षेला धोका आहे.  जागतिक अर्थव्यवस्था व िवकासाच्या मार्गात हा मोठा अडथळा असून त्याच्या उच्चाटनासाठी एक व्यापक धोरण बनवण्याची गरज भारताने व्यक्त केली आहे. सोमवारी रशिया-भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या १५ व्या बैठकीनंतर संयुक्त वक्तव्यात ही भूमिका मांडण्यात आली. तीनही देशांनी दहशतवाद आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांना कडक संदेश देताना त्यांना जबाबदार ठरवले गेले पाहिजे. त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांअंतर्गत दंड दिला पाहिजे, असे म्हटले आहे.


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी व रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हारोव्ह यांच्या उपस्थितीत संयुक्त वक्तव्य जारी केले. इसिस, अल-कायदा व लष्कर-ए-तोयबाच्या वाढत्या कारवायांमुळे जगभरातील शांतता व सुरक्षेच्या प्रयत्नांना धोका निर्माण झाला आहे. ते म्हणाले, दहशतवादी कारवायांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बळकट करणे किंवा शाश्वत विकास निश्चित करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसू लागला आहे. भारताने जागतिक दहशतवादाच्या उच्चाटनासाठी एका व्यापक धोरणाची शिफारस केली आहे. धार्मिक कट्टरवादाचा मुकाबला करणे, दहशतवाद्यांची भरती रोखणे, दहशतवाद्यांचा पैशांची रसद थांबवणे, इंटरनेटच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या अपप्रचाराचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करण्याचा समावेश या बैठकीत स्वीकारण्यात आलेल्या नवीन धोरणात करण्यात आला.

 

डोकलाममध्ये १८०० चिनी सैनिक तैनात
भूतानच्या सीमेजवळ डोकलाम क्षेत्रात १६००-१८०० चिनी सैनिक पुन्हा घुसले आहेत. ते या भागात हेलिपॅड्स, रस्ते व तळ बनवण्याचे काम करत आहेत. भारताला रणनीतीच्या दृष्टीने आवश्यक लक्ष्य मिळाले आहे आणि चीनला दक्षिणेकडून रस्त्यांचा विस्तार करू दिला जाणार नाही. या भागात पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान कायम तळ ठोकून राहतात.

 

 

डोकलामसारखा वाद संबंधातील अडथळा ठरू शकत नाही : यी
सिक्कीम, भूतान सीमेशी लागून असलेल्या डोकलाममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतासोबतच्या आपल्या संबंधांना महत्त्वपूर्ण मानले आहे. भारत दौऱ्यावर निघण्यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी म्हणाले, चीन व भारताने डोकलाम प्रश्न मिटवला आहे. तो ज्या पद्धतीने मिटवण्यात आला, त्यावरून दोन्ही देशांतील संबंध कोणत्या पातळीवरील आहेत, हे दिसून येते. डोकलाम हा चीनचा भाग आहे. भारत-चीन संबंधाचे रणनीतीच्या पातळीवर महत्त्व खूप आहे. त्यामुळे लहानसहान संघर्षाला संबंधात फारसे महत्त्व नाही. कूटनीतीच्या प्रयत्नांनंतर भारताने आपली शस्त्रे व सैनिक माघारी घेतले. त्यावरून दोन्ही देशांचे संबंध लक्षात येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...