आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी इशाऱ्याने दिला जायचा \'सेफ सेक्स\'चा मेसेज, नंतर अशा बदलत गेल्या कंडोमच्या जाहिराती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारने सर्व टीव्ही वाहिन्यांना कंडोमच्या जाहिराती सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. - Divya Marathi
सरकारने सर्व टीव्ही वाहिन्यांना कंडोमच्या जाहिराती सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली - माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व टीव्ही वाहिन्यांसाठी एक सूचना जारी करत म्हटले की, आता सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत टीव्ही चॅनल्सवर कंडोम अॅड दाखवली जाणार नाही. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या जाहिरातींमुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहे. सूत्रांनुसार, मंत्रालयाने रिअॅलिटी शो 'बिग बॉस'ही रात्री उशिरा टेलिकास्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

चेहरा नसलेल्या आणि डायलॉगवाल्या असायच्या कंडोम जाहिराती
- भारतात सुरुवातीच्या काळात सेफ सेक्सला चालना देण्यासाठी निरोधची जाहिरात आली. या जाहिरातीत ना चेहरा होता, ना कोणताही डायलॉग होता. फक्त बॅकग्राउंडमध्ये एक गाणे 'दांतों तले क्या इश्क कट रहा है, दिल बेईमान, बेईमान है' वाजायचे.
- शेखर सुमनची कंडोम जाहिरात ज्यात मेडिकल स्टोअरवर कंडोम खरेदी करताना लाज वाटते म्हणून शेखर बाम विकत घेतात, परंतु जेव्हा मेडिकल स्टोअरवर औषध विक्रेत्याला वाटते की, त्यांना कंडोम पाहिजे, पण बोलायला घाबरत आहे, मग तो त्यांना कंडोमच्या वापराबाबत माहिती देतो.
- याच तऱ्हेने दूरदर्शनवर कोहिनूर कंडोमची जाहिरात ज्याची टॅगलाइन होती, 'इस रात की सुबह न हो.' या जाहिरातीलाही प्रेक्षकांनी पसंत केले. 

 

कामसूत्र ब्रँडने बदलला कंडोम अॅडचा ट्रेंड
- 1991 मध्ये कंडोमची जाहिरात दाखवण्याचा ट्रेंड कामसूत्र ब्रँडने बदलला. या जाहिरातीत अॅक्ट्रेस पूजा बेदीला कास्ट करण्यात आले होते. ही पूर्ण जाहिरातच बाथरूममध्ये शूट झाली होती.
- सनी लियोनीपासून ते रणवीर सिंहपर्यंत कंडोम जाहिरातीवर खूप काँट्रोव्हर्सी झाली. सनी लियोनीची 'मन क्यों बहका' गाण्यावर चित्रित झालेली जाहिरात चर्चेत राहिली. दुसरीकडे रणवीर सिंहच्या ड्युरेक्स कंडोम जाहिरातीचीही खूप चर्चा झाली.
- बिपाशा बसूची तिचा पती करणसिंग ग्रोव्हरसोबत आलेल्या कंडोम अॅडने येताच वाद उभा केला. या अॅडची पंचलाइन होती- इट्स टू हॉट टू हँडल.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसच्या घरात आलेल्या या जाहिरातीचे पोस्ट सलमान खानने हटवले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कशा बदलत गेल्या कंडोमच्या जाहिराती 

बातम्या आणखी आहेत...