आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगमन अन् ट्रॅकमनसारख्या कर्मचाऱ्यांना रेल्वे विभाग पाठवतेय सिंगापूर,मलेशियाला सहलीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्मचाऱ्यांचा ताण घालवण्यासाठी रेल्वे विभागाकडून त्यांना सहलीसाठी परदेशात पाठवले जात आहे. विशेष म्हणजे परदेश दौऱ्यात अधिकारी नव्हे तर सी आणि डी ग्रेड कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे गँगमन, ट्रॅकमन आणि अराजपत्रित १०० कर्मचाऱ्यांना सिंगापूर, मलेशियात पाठवण्यात आले. सहल सहा दिवसांची असून २५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागेल. 


७५ टक्के रक्कम स्टाफ बेनिफिट फंडातून दिली जाईल.  पहिल्यांदा पाठवण्यात आलेल्या १०० कर्मचाऱ्यांत कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांचा अगोदर विचार केला गेला आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी उमाशंकर म्हणाले की, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात आलेली ही पहिलीच योजना आहे. परदेशी सहलीमध्ये युनिव्हर्सल स्टुडिअो, नाइट सफारी, क्वालालंपूर शहर, पेट्रोनास टॉवर्स आदी ठिकाणी पर्यटन केले जाणार आहे. रेल्वे विभागातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्टाफ बेनिफिट फंड दिला जातो. या निधीतून आतापर्यंत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती. मुलांसाठी विविध शिबिरेही घेतली जात होती. परंतु यंदा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांना परदेशात पाठवण्याची योजना डिसेंबर महिन्यात बनवण्यात आली. महिनाभरात तर त्यांना सहलीसाठी रवाना करण्यात आले.   

रेल्वे विभाग आरडीएसओच्या मदतीने स्वच्छता ठेवणार, स्वच्छतेशी संबंधित ६० टक्के तक्रारी होणार कमी

रेल्वे विभाग दरवर्षी स्वच्छतेवर २,३०० कोटी रुपये खर्च करते. परंतु तरीही स्वच्छतेविषयी तक्रारी प्राप्त होत असतात. यावर आळा घालण्यासाठी रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनला (आरडीएसओ) रेल्वेगाड्यांमध्ये सफाईची जबाबदारी सोपवली गेली आहे. आरडीएओकडून स्वच्छतेची काळजी तर घेतली जाईल, शिवाय स्वच्छता आणि प्रवाशांच्या आरामाच्या दृष्टीने आदर्श व्यवस्था निर्माण करण्यात येईल. आरडीएसओवर जबाबदारी सोपवल्यानंतर स्वच्छतेशी संबंधित ६० टक्के तक्रारी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरडीएसओ कोच प्रोडक्शन युनिटला सोबत घेऊन गाडीत सीसीटीव्ही, फायर आणि स्मोक डिटेक्शन डिव्हाइस, एलसीडी, एलईडी डिस्प्ले बोर्ड लावण्याचे काम करणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...