आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता चेहऱ्यावरूनही आधारची पडताळणी; नवी सुविधा 1 जुलैपासून लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता तुमच्या चेहऱ्याद्वारेही आधारची पडताळणी करता येईल. आधारच्या सुरक्षेसाठी यूआयडीएआयने हा निर्णय घेतला आहे. अाधारमध्ये ओळख पटवण्यासाठी बोटांचे ठसे व डोळ्यांच्या बाहुल्यांसह आता फेस रिकग्निशनचाही समावेश करण्यात आला आहे. 
ज्यांचे बोटांचे ठसे उमटत नाहीत वा डोळ्यांच्या बाहुल्यांनीही पडताळणी होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही नवी सुविधा असून ती १ जुलैपासून लागू होईल. चेहऱ्याची ओळख फ्यूजन मोडमध्येच स्वीकारली जाईल. म्हणजे चेहऱ्याच्या ओळखीसह बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बाहुल्या किंवा ओटीपीपैकी एक पर्याय असेल.


का आणले जातेय फेस ऑथेंटिकेशन फिचर?
- UIDAI चे सीईओ आजय भूषण पांडे यांनी या फिचरची माहिती ट्वीटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, UIDAI लोकांची ओळख पटवण्यासाठी आणखी एक तंत्रज्ञान आणत आहे - फेस ऑथेंटिकेशन. या फिचरमुळे वयस्कर आणि ज्यांच्या फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनमध्ये अडचणी येतात त्यांना मदत मिळेल. 1 जुलै 2018 पासून ही सेवा सुरू केली जाईल. 
- UIDAI ने म्हटले आहे की, आता आधार नोंदणीसाठी लोकांच्या चेहऱ्यांचे फोटोही घेतले जातील. 


सध्या असे होते ऑथेंटिकेशन?
- आधारमध्ये नोंदणीसाठी सध्या लोकांचे आयरिस आणि फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात. पण अनेक लोकांना डोळ्यांचा त्रास किंवा मिटलेल्या फिंगरप्रिंटमुळे ऑथेंटिकेशनमध्ये अडचणी येतात. 
- फेस ऑथेंटिकेशन फिचरमुळे लोकांचा त्रास कमी होणार आहे. पण हे फिचर दुसऱ्या ऑथेंटिकेशन फिचर (आयरिस, फिंगरप्रिंट स्कॅन किंवा OTP) बरोबरच वापरले जाईल. वन टाइम पासवर्ड (OTP) फिचरमध्ये ऑथेंटिकेशनसाठी आधार यूजरच्या मोबाईलवर एक पासवर्ड पाठवला जाईल. त्यामुळे त्यांची ओळख पटवली जाईल. 


व्हर्च्युअल आयडी जारी करण्याचा निर्णय झाला 
- आधार डाटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने बुधवारी व्हर्च्युअल आयडीच्या नव्या सिस्टीमची घोषणा केली. कोणत्याही 
- ग्राहकाला त्याचा 12 डिजीटचा आधार क्रमांक सांगायचा नसेल तर व्हर्च्युअल आयडी दिला जाऊ शकतो. 
- सर्व एजन्सी 1 जूनपासून याच आयडीच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन करतील. आधार धारकाला युआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे हा आयडी मिळवता येईल. 16 डिजीटच्या व्हर्च्युअल आयडीचा वापर पर्याय म्हणून सिम व्हेरीफिकेशनसह अनेक स्कीममध्ये केवायसीसाठी होईल. 


व्हेरीफिकेशन प्रोसेसमध्ये हा असेल बदल 
- UIDAI ची ही नवी सुविधा सुरू झाल्यानंतर यूझर्सना व्हेरीफिकेशनसाठी आधार क्रमांक सर्व्हीस प्रोव्हायडरला द्यावा लागणार नाही. त्याऐवजी व्हर्च्युअल आयडीद्वारेही काम पूर्ण होईल. 
- 1 जून, 2018 पासून सर्व एजन्सींना व्हर्च्युअल आयडीनेच व्हेरीफिकेशन करणे अनिवार्य असेल. ते मान्य केले नाही तर एजन्सींवर कारवाई केली जाईल. 


कसा जनरेट होईल व्हर्च्युअल आयडी?
- 16 डिजीटचा व्हर्च्युअल आयडी आधारशी मॅप असेल. तो UIDAI च्या वेबसाईटद्वारे जनरेट केला जाऊ शकेल. गरजेनुसार आधार होल्डर अनेकदा तो जनरेट करू शकतील. नवीन व्हर्च्युअल आयडी जनरेट केल्यानंतर जुना आपोआच रद्द होईल. 
- व्हर्च्युअल आयडी कॉम्प्‍यूटरद्वारे तयार झालेला क्रमांक असेल. गरज असेल तेव्हा तो तत्काळ मिळवता येईल. एक मार्चपासून तो जनरेट करता येऊ शकेल. 


आधारचा वापर कमी करणार 
- दुसरीकडे सरकार केवायसीसाठी आधारचा वापरही कमी करणार आहे. सध्या अनेक एजन्सींकडे तुमचे डिटेल्स जातात आणि त्या एजन्सी ते स्वतःकडे ठेवतात. 
- जेव्हा केवायसीसाठी आधारची गरजच कमी होईल तेव्हा तुम्ही माहिती असेल अशा एजन्सीची संख्याही कमी होईल. 

बातम्या आणखी आहेत...