आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 34000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - या वर्षी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ३४ हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे विविध देशांत सोन्याचा भाव सध्याच्या भावापेक्षा २ हजार रुपयांनी वाढू शकतो. शनिवारी स्थानिक बाजारपेठेत सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून ३२,०५० वर पोहचला. तर, न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी हा भाव ०.१७ टक्क्यांनी वाढून १,२९९ डॉलर प्रतिऔंस राहिला.


कॉमट्रेंड्झ रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांच्या मते, दिवाळीपर्यंत सोने ३० हजारवरून ३४ हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. आगामी काळात महागाईचा दर वाढला तर व्याजदरही वाढतील. त्यामुळे लोकांचा कल सोन्यातील गुंतवणुकीकडे वाढेल. सोन्याची मागणी वाढेल. दुसरीकडे रुपयाचे मूल्य घसरत असल्याने सोने दिवाळीपर्यंत विक्रमी पातळी गाठू शकते.

 

भाव ३०,५०० रुपयांपर्यंत
एंजल ब्राेिकंगचे प्रथमेश मलय यांच्या मते, अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता पाहता साेने ३०,५०० रुपये राहू शकते.

 

बातम्या आणखी आहेत...