आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञान वापरा:सुप्रीम कोर्ट;जाेखमीच्या जागी काम करणाऱ्यांबद्दल चिंता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अापला देश तंत्रज्ञानाचे माहेरघर असतानाही भारतात तंत्रज्ञानाचा विकासासह कल्याणासाठी पाहिजे तसा वापर न हाेणे निराशाजनक अाहे. देशात तंत्रज्ञानाचा व्यक्तीच्या खासकरून मुलांच्या कल्याणासाठी वापर करण्याबाबत असलेली उदासीनता चिंता वाढवणारी असल्याचे मत सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले.


बालन्याय महामंडळ, बालकल्याण समितीसह केंद्र सरकारबाबत दाखल एका याचिकेवर बाेलताना सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन बी. लाेकूर व न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठाने देशात तंत्रज्ञानाचा बालकांच्या विकासासाठी वापर हाेणे अपेक्षित अाहे; परंतु दुर्दैवाने असे हाेत नसल्याचे निरीक्षण नाेंदवले. विशेषत: हरवलेल्या मुलांच्या शाेधासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. तसेच जाेखमीच्या उद्याेगांत काम करणाऱ्या व लैंगिक शाेषणाचे शिकार झालेल्या बालकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा विकास घडवून अाणणे गरजेचे अाहे. त्यासाठी बालन्याय महामंडळ व बालकल्याण समितीला पुरेशा प्रशिक्षित मनुष्यबळासह इंटरनेट सेवा, संगणक अादी पुरवले गेले पाहिजे. बालकांच्या कल्याणासाठी हे अावश्यक अाहे. कारण भारत हा तंत्रज्ञानाची माेठी शक्ती अाहे; परंतु याच तंत्रज्ञानाचा व्यक्तीच्या कल्याणासाठी उपयाेग हाेत नसेल, तर ही बाब केवळ कागदाेपत्रीच राहील, असेही सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले. तंत्रज्ञानाची नियाेजन व व्यवस्थापन करण्यात माेठी मदत हाेते. त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन बालकल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साेई-सुविधा पुरवणे अावश्यक अाहे. तंत्रज्ञानाचा उपयाेग केवळ डेटा एकत्र करण्यासाठी नव्हे, तर व्यक्तीची कार्यक्षमता वाढण्यासाठी झाला पाहिजे. असे झाल्यास बालकल्याणाचे चांगले परिणाम समाेर येतील. त्यासाठी केंद्र सरकारसह राज्यांनी समन्वय ठेवून काम करण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...