आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सनदी अधिकाऱ्याच्या मुलीसाठी भारताने अमेरिकेशी घेतला होता पंगा, आता काँग्रेसमध्ये प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे. - Divya Marathi
माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील माजी सनदी अधिकारी आणि रिपब्लिकर पक्षाचे नेते उत्तम खोब्रागडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत दुसरे माजी सनदी अधिकारी  किशोर गजभिये यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गजभिये हे बहुजन समाज पक्षात होते. काँग्रेसने या दोन्ही नेत्यांचे स्वागत केले आहे.

 

काय आहे खोब्रागडे-गजभिये यांच्या प्रवेशाचा अर्थ 
- माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. 
- खोब्रागडे आणि गजभिये सनदी अधिकारी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला काय फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल असे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे यांनी सांगितले. 
- खोब्रागडे हे रिपाईच्या आधी रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षासोबतही जोडलेले होते. 

 

रिपाईमध्ये होते खोब्रागडे 
- सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर उत्तम खोब्रागडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. मात्र तिथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली नव्हती. रिपाईने भाजपसोबत जाणेही त्यांना आवडलेले नव्हते. 
- मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहिलेले किशोर गजभिये यांनी पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली होती. त्यानंतर ते बहुजन समाज पक्षात गेले होते. आता त्यांनी मायवतींच्या बसपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

 

खोब्रागडेंच्या मुलीमुळे भारताने अमेरिकेशी घेतला होता पंगा 
- उत्तम खोब्रागडे यांची कन्या देवयानी खोब्रागडे या भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी आहेत. 
- देवयानी खोब्रागडे या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील भारतीय दुतावासात राजनयिक अधिकारी होत्या. सध्या त्या न्यूयॉर्क येथेच संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये कार्यरत आहेत. 
- 1999च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी असलेल्या देवयानी यांच्यावर 2013 मध्ये बनावट व्हीजा आणि हाऊस मेडचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप झाला होता.   
- 12 डिसेंबर 2013 मध्ये सार्वजनिक ठिकाणी त्यांना हतकडी लावून न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली होती. 
- याप्रकरणामुळे तत्कालिन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांनी अमेरिकेला खडसावले होते. राजनयिक अधिकाऱ्याला असलेल्या विशेष अधिकारांचा अमेरिकेने भंग केल्याचा आरोप झाला होता.
- देवयानी यांच्या अटकेनंतर भारत सरकारने नवी दिल्ली येथील अमेरिकी दुतावासाच्या सर्व सोयी-सुविधा बंद केल्या होत्या. यानंतर अमेरिका नरमली होती आणि त्यांनी एक राजनयिक अधिकारी असल्यामुळे देवयानी यांना खटल्यातून सूट मिळत असल्याचे त्यांचे वकील डेनियल अर्शहाक यांनी सांगितले होते. 
- देवयानी यांची अटक आणि त्यांच्यासोबतच्या अपमानास्पद वागणुकीबद्दल अमेरिकेने खेद व्यक्त केला होता. 

बातम्या आणखी आहेत...