Home »National »Delhi» Weather Round Up Snowfall Hailstorm Kashmir Madhya Pradesh Maharashtra News And Updates

काश्मीर-हिमाचल-उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, श्रीनगर एअरपोर्ट, जम्मू हायवे बंद

दिव्य मराठी वेब टीम | Feb 12, 2018, 15:23 PM IST

  • शिमल्यात टुरिस्ट स्पॉटवर बर्फवृष्टी झाल्याने पर्यटक आनंदात आहेत.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील टिहरी येथे बर्फवृष्टी सुरु आहे. श्रीनगर विमानतळ आणि जम्मू-श्रीनगर हायवे बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील काही भागाला रविवारी गारपिटीचा तडाखा बसला. यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीने थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहतीनुसार, गारिपीटग्रस्त दोन्ही राज्यांमध्ये हवामान पूर्वपदावर येण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.


जम्मू-काश्मीर
- जम्मू-काश्मीरच्या मैदानी भागात दोन महिने हवामान सामान्य राहिल्यानंतर सोमवारी पावसाला सुरुवात झाली. डोंगराळ भागात हलक्या स्वरुपाची बर्फवृष्टी होत आहे.
- खोऱ्यात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- ऑफिसर्सने सांगितले आहे की बर्फवृष्टी थांबल्यानंतर हायवेवरील बर्फ हटवण्याचे काम सुरु होईल.

Next Article

Recommended