आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिटकॉइनने कमाई करणाऱ्यांना द्यावा लागेल TAX, उत्पन्नाचे स्त्रोतही सांगावे लागतील - CBDT

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  व्हर्च्यूअल करन्सी बिटकॉइनने कमाई करणाऱ्यांचना आता टॅक्स द्यावा लागणार आहे. सीबीडीटीचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी मंगळवारी सांगितले, की बिटकॉइनने कमाई करत असल्यास त्यावर टॅक्स दिला नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याशिवाय यातून कमाई करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोतही सांगावे लागेल. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिटकॉइन करन्सी लीगल नसल्याचे म्हटले आहे. 

 

बजेटमध्ये क्रिप्टो करन्सीवर काय म्हणाले जेटली
- अरुण जेटलींनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. जेटलींच्या अर्थसंकल्पिय भाषणात क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख होता. जेटली म्हणाले होते, 'सरकार क्रिप्टोकरन्सी आणि कॉइनला कायदेशीर मानत नाही. ही करन्सी नष्ट करण्यासाठी पावले उचलली जातील. बेकायदेशीर कृत्यांमध्ये क्रिप्टो करन्सीद्वारे होणारे फायनान्स संपुष्टात आणले जाईल, त्यासाठी सरकार पावले उचलत आहे.'

 

बिटकॉइनचे दर घसरले? 
- अर्थसंकल्पाआधी बिटकॉइनचे दर 11,685 यूएस डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार 7,49,446 रुपये होतात. मात्र अर्थसंकल्पानंतर दोन दिवसांनी त्याचे रेट 8574 यूएस डॉलर्स एवढे झाले. भारतीय चलनानुसार त्याची किंमत 5,49,914 रुपये आहे. या दरम्यान या करन्सीचे दर 27 टक्क्यांनी खाली आले आहेत.


काय आहे बिटकॉइन ? 
- बिटकॉइन एक डिजिटल करन्सी आहे. या करन्सीचा वापर डिजिटल वॉलेटमधूनच होऊ शकतो. 
- 2009 मध्ये एका अज्ञात व्यक्तीने याची निर्मिती एलियस सतोशी नाकामोटी नावाने केली होती. 
- बँकांशिवाय देव-घेव करण्याची पद्धत या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. भारतामध्ये या करन्सीला कायदेशीर मान्यता नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...