आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Obesity: इतका लठ्ठ की डोळेही उघडता येत नव्हते, सर्जरीनंतर घटवले 65 किलो, दिल्लीत झाली शस्त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या यशस्वी शस्त्रक्रिया आणि वजन कमी केल्यानंतर अखेर 14 वर्षीय मिहीर व्यवस्थितपणे श्वास घेऊ शकतो. तो इतका लठ्ठ होता की चालणे तर दूरच, त्याला आपले डोळे सुद्धा उघडता येत नव्हते. त्याला शाळेतून काढण्यात आले. दिवसभर बेडवरून बसून तळलेले खाद्य पदार्थ खाणारा मिहीर रागित बनला होता. थोड्याशाही गोष्टीचा त्याला खूप राग येत होता. अखेर दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर गॅस्ट्रिक सर्जरी करण्यात आली. गेल्या 2 महिन्यात या सर्जरीमुळे त्याने आपले वजन 65 किलोंनी कमी केले आहे. इतक्या लठ्ठ मुलावर तेही या वयात गॅस्ट्रिक सर्जरी अशक्य वाटत होते. तरीही मॅक्स हॉस्पिटलच्या टीमने ते यशस्वीरित्या करून दाखवले.


मिहीरच्या आईने सांगितला प्रवास...
- मिहीरच्या आई पूजा जैन यांनी सांगितल्याप्रमाणे, मिहीरचे वजन वाढत असल्याचे आम्हाला 6 वर्षांपूर्वीच लक्षात आले होते. वाढत्या वजनामुळे त्याचे चालणे फिरणे बंद झाले होते. त्याला शाळेतून काढण्यात आले. मात्र, मुलीची शाळा व्यवस्थित सुरू होती. आपणच बाहेर पडू शकत नाही या चिंतेत तो अंथरुणाला खिळला. दिवसभर पलंगावरून न उतरता फक्त तळलेले पदार्थ खात होता. 
- 2012 मध्ये मिहीर इतका जाड झाला होता, की त्याला चालणे तर दूर त्याचे डोळे सुद्धा व्यवस्थित उघडत नव्हते. यानंतर पूजा यांनी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलशी संवाद साधला. मुलाला चालताच येत नसल्याने आई-वडिलांनी दोघांनी रुग्णालय गाठले. परंतु, त्यावेळी मिहीरवर उपचार होऊ शकले नाही. उपचार सुरू होइपर्यंत 5 वर्षे लोटली होती. तसेच वयाच्या 14 व्या मिहीरचे वजन 237 किलो झाले होते. 
- अखेर 2 महिन्यांपूर्वी डॉ. प्रदीप चौबे यांच्या हस्ते मिहीरचे ऑपरेशन झाले. इतक्या लहान वयात गॅस्ट्रिक सर्जरी करणारा तो जगातील पहिला मुलगा ठरला आहे. गेल्या दोन महिन्यात या शस्त्रक्रियेचे परिणाम समोर आले. मिहीरने आपले वजन 65 किलोंनी कमी केले. तसेच दिवसेंदिवस त्याचे वजन आणखी कमी होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...