आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्धिक संपदा संरक्षणासाठी भारत घेणार जागतिक संमेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -   योग, हळद, निंब, खादीसारख्या पारंपरिक वारसा  व ज्ञानासंबंधी बौद्धिक संपदा हक्काच्या संरक्षणासाठी भारत पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमधील जीनिव्हात एक जागतिक संमेलन आयोजित करणार आहे. त्यात प्रगत तसेच विकसनशील देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील.  


भारताने दीर्घकाळापासून बौद्धिक संपदा हक्काच्या संरक्षणावर भर दिला आहे. त्याचबरोबर यासंबंधी जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवण्याचाही भारताने नेहमीच प्रयत्न केला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी दिली. जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत व्यापार बौद्धिक हक्कासंबंधीच्या करारात संयुक्त राष्ट्र जैवविविधता संरक्षण करारानुसार (सीबीडी) बदल करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.  


७ -८ जूनदरम्यान चर्चा

जीनिव्हामध्ये ७ व ८ जूनदरम्यान जागतिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात चीन, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, दक्षिण आफ्रिकेसह अनेक विकसित तसेच विकसनशील देशांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन दि ट्रिप्स सीबीडी लिंकेज : इश्यूज अँड वे फॉरवर्ड’ असे संमेलनाचे नाव आहे.  


बौद्धिक संपदेला स्थानिकतेशी जोडण्याचा उद्देश 

संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण करारानुसार बौद्धिक संपदेला स्थानिकतेच्या दृष्टीने उपयुक्त करण्याचे मोठे आव्हान जगाला समोर आहे. करारात त्यासाठी काही बदल करून अपेक्षित परिणाम साधता येऊ शकेल, असे पांडे यांनी सांगितले.

 

संमेलनात भारताने मांडली होती चिंता  
बौद्धिक संपदा हक्काचा मुद्दा अलीकडेच अमेरिकेत झालेल्या एका गुंतवणूक संमेलनात मांडण्यात आला होता. त्यात भारताने याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. जागतिक पातळीवर बौद्धिक संपदा नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना वाढू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यावर सहमती झाली होती. चीनने अनेक वेळा अशा प्रकारचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. 

बातम्या आणखी आहेत...