आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 29 Handicrafts Items Have Been Put In 0% Slab And Tax Has Been Reduced On Around 49 Items

गणेश मुर्तीसह 29 वस्तूंवरील GST हटवला; पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय नाही, नाट्य रसिकांनाही फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जीएसटी परिषदेच्या 25 व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 29 हस्तकला वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. तर, 49 वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी ही माहिती दिली. या बैठकीत विविध प्रकारच्या 80 वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा अजेंड्यावर होता. या बैठकीत पेट्रोल-डिझेलवर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. येत्या 25 जानेवारीपासून जीएसटी नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. 500 रुपयांपर्यंतच्या नाटकांच्या तिकिटावरही GST असणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

 

 

जीएसटी परिषदेच्या बैठकीत 49 वस्तूंवरील जीएसटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वस्तूंवरील जीएसटी 5 ते 12 टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये शेतीतील सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्या 29 हस्तकलेच्या वस्तूंवरील कर हटवण्यात आला आहे. यामध्ये गणेश मूर्तींसारख्या वस्तूंचा समावेश आहे. कारण देव-देवतांच्या मूर्तीकला ही हस्तकला या प्रकारात मोडते. यामुळे राज्याला या निर्णयाचा फायदा होणार असून यामुळे येत्या वर्षातील गणेशोत्सवात गणेश मूर्ती स्वस्त झालेल्या असतील. दरम्यान, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...