आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा: ज्वारी, सोयाबीन, कापसासह 14 पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या 50% अधिक हमीभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०१८-१९ साठी खरिपातील १४ पिकांना किमान हमीभाव (एमएसपी) जाहीर केला. यात प्रामुख्याने धानाच्या (तांदूळ) साधारण जातीसाठी किमान हमीभावात २०० रुपये प्रतिक्विंटल एवढी विक्रमी वाढ करण्यात आली. त्यामुळे धानाचा हमीभाव १,५५०हून १,७५० रुपये झाला. अ-दर्जाच्या धानासाठी ही वाढ १८० रुपये असून हा हमीभाव १,५९० वरून १,७७० झाला आहे. साधारण जातीच्या धानाचा हमीभाव उत्पादन खर्चाहून ५० टक्के आणि अ-दर्जाच्या धानाचा हमीभाव उत्पादन खर्चाच्या ५२ टक्के अधिक आहे. निर्णयाची माहिती देताना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सरकारी तिजोरीवर १५,००० कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगितले.


२०१४च्या निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाहून ५० टक्के अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या वेळी अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रब्बी पिकांसाठी दिला जाणारा हमीभाव दीडपट अधिक झाला असल्याचे सांगून खरिपासाठीही दीडपट हमीभाव निश्चित केला जाईल, असे आश्वासन दिले होते. 


उत्पादन खर्चात गृहीत धरला हा खर्च...
उत्पादन खर्चात कुटुंबातील सदस्य व कामगारांची मजुरी, बैल-बारदाना, मशीनसाठी येणारा खर्च, बी-बियाणे, खत आणि सिंचनासाठी येणारा खर्च इत्यादीचा समावेश आहे.


यूपीए सरकारने तेव्हा वाढवले होते १७० रु.
यापूर्वी २०१२-१३ मध्ये धानासाठी हमी भाव सर्वाधिक म्हणजे १७० रुपये वाढवण्यात आला होता. तत्कालीन यूपीए सरकारने निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला होता.

 

पुढील स्लाइडर वाचा नवे हमीभाव...

 

बातम्या आणखी आहेत...