आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव-चौकसीसह 64 लोक, कंपन्यांना संपत्ती विकण्यास मनाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिरा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चौकसी आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोक तसेच कंपन्या त्यांच्या संपत्तीची विक्री करू शकणार नाहीत. पंजाब नॅशनल बँकेतील १२,७१७ कोटींच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने ६४ लोक आणि कंपन्यांवर ही बंदी घातली. यात नीरवची कंपनी फायरस्टार डायमंड, मेहुलची गीतांजली जेम्स, गिली इंडिया, नक्षत्र आणि पीएनबीचे काही कर्मचारी सामील आहेत.


कंपनी व्यवहार मंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी एनसीएलटीने आदेश दिले. दरम्यान, नीरव-मेहुलशी संबंधित घोटाळ्यात सर्व दोषींवर कारवाईचे आश्वासन मॉरिशसने दिले. प्रसारमाध्यमातील बातम्या पाहता भारतीय तपास संस्थांकडून माहिती मिळवली जात असल्याचे मॉरिशसमधील फायनान्शियल सर्व्हिसेस कमिशनने म्हटले.

बातम्या आणखी आहेत...