आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-फायलिंगसाठी 7 आयटीआर फॉर्म जारी; वेतन ब्रेक-अप, जीएसटी नंबर द्यावा लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ई-फायलिंगसाठी प्राप्तिकर विभागाने सर्व सात आयकर परताव्याचे (आयटीआर) फॉर्म जारी केले आहेत. यामुळे करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परतावा भरणे सोपे झाले आहे.  
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) २०१८-१९ या वर्षासाठी मागील महिन्यात आयकर परताव्याचे नवीन फॉर्म जारी केले होते.

 

सीबीडीटीनुसार आता सर्व आयटीआर फॉर्म   ई-फायलिंगसाठी उपलब्ध आहेत. कर विभागाकडून ५ एप्रिलनंतर आयटीआर फॉर्म जारी केले जात आहेत. ३१ तारखेच्या अगोदर सर्व सात फॉर्म विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in  वर भरता येतील. 

 

वेतन ब्रेक-अप, जीएसटी नंबर द्यावा लागेल
नव्या आयटीआर फॉर्ममध्ये पगारदार वर्गातील करदात्यांना त्यांच्या वेतनातील ब्रेक-अप, व्यावसायिकांच्या वर्गात करदात्यांना जीएसटी नंबर व उलाढालीची माहिती द्यावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...