आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीला काळिमा, 8 महिन्यांच्या चिमुकलीवर RAPE; पिता म्हणाला- मुलगी रक्ताने माखलेली होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.

नवी दिल्ली - माणुसकीला काळिमा फासणारी घटना दिल्लीमध्ये घडली आहे. अवघ्या 8 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना सोमवारी घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की मुलीला घरी सोडून आम्ही पती-पत्नी कामावर गेलो होते. परत आलो तर मुलीच्या कपड्याला आणि तिच्या अंथुरणावर रक्ताचे डाग होते. 

 

आरोपी दोन मुलांचा बाप 
- पीडितेच्या वडिलांनी सांगितले की मी आणि माझी पत्नी मजुरी करतो. घराच्या जवळच काम करत होतो. आधी मी घरा बाहेर पडलो नंतर पत्नी कामावर आली. एका तासानंतर आम्ही घरी आलो, तेव्हा पाहातो तर मुलगी रक्ताने माखलेली होती. 
नातेवाईकाला विचारले हे काय झाले, तर त्याने टोलवाटोलवीची उत्तरे दिली.
- मुलीला तत्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगण्यात आले. 
- आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांनी शेजारी राहाणाऱ्या नातेवाईकवावर संशय व्यक्त केला. तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला तातडीने जेरबंद केले. पोलिस चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. 


माणुसकीला काळिमा 
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की यापेक्षा वाईट काय असू शकते?  राजधानीमध्ये 8 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार झाला आहे. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर सध्या ती आहे. या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. आरोपी एक मुलगी आणि मुलाचा पिता आहे. असे असताना त्याने हे घृणास्पद कृत्य केले आहे. 

 

दिल्लीत वाढल्या बलात्काराच्या घटना 
- दिल्लीत गेल्या काही महिन्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच महिन्यात हरियाणातील जिंद येथे 10वीच्या मुलीचा मृतदेह छिन्न-विछिन्न स्थितीत आढळला होता. आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये धारदार वस्तूही टाकल्या होत्या. 
- पानीपतमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. मुलीचा मृत्यू झाल्यानंतरही तिच्यावर बलात्कार झाला होता. अशी माहिती आहे की शेजारी राहाणाऱ्या दोन जणांनी मुलीवर अत्याचार केले होते. 

बातम्या आणखी आहेत...