आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराण-भारत यांच्यात 9 करार, चाबहारचे नेतृत्व भारताकडे; इराण राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी शनिवारी हैदराबादहून दिल्लीला पोहोचले. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. रुहानी यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण केली. मोदी व रुहानी यांच्यात दहशतवाद, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांत ९ सहमती करार झाले.

 

उभय देशांतील ९ करार

- दुहेरी करप्रणाली, कर चुकवेगिरील प्रतिबंध.
- कूटनीतिसाठी पासपोर्ट
असणाऱ्यांना व्हिसात सवलत.
- प्रत्यर्पण करार लागू करण्यासाठी करार.
- चाबहार बंदरच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सामंजस्य करार.
- पारंपरिक व्यवसायाच्या क्षेत्रात सहकार्य.
- परस्पर व्यापार.
- कृषीसंबंधित क्षेत्र आरोग्य-आैषधीच्या क्षेत्रात सहकार्य.
- पोस्टल क्षेत्रात सहकार्य.

 

 

मोदी : दोन्ही देश शेजाऱ्यास दहशतवादमुक्त पाहू इच्छितात

 

चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देश द्विपक्षीय संबंध बळकट करू इच्छितात. रुहानी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे संबंध जास्त बळकट होतील. चाबहारसाठी इराणने भारताला नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याबद्दल भारत त्यांचे आभार व्यक्त करतो. आज अनेक करार झाले. मी २०१६ मध्ये भेटीचा आराखडा तयार केला होता. आम्ही अफगाणिस्तानला शांत, समृद्ध असल्याचे पाहू इच्छितो. आम्ही शेजाऱ्यांना दहशतवादापासून मुक्त पाहू इच्छितो.

 

रुहानी : स्नेहासाठी धन्यवाद, रेल्वे संबंधही सुरू करू इच्छितो

 

राष्ट्राध्यक्ष रुहानी म्हणाले, आम्हाला भारताकडून खूप स्नेहाची वागणूक मिळाली. येथील लोक आणि सरकारचे आभार व्यक्त करतो. दोन्ही देशांचे संबंध व्यापाराच्याही खूप पलिकडचे आहेत. त्याची मुळे इतिहासात सापडतील. परिवर्तन आणि अर्थव्यवस्था या दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आमचे मत एक आहे. आम्ही उभय देशांत रेल्वेद्वारे देखील संबंध निर्माण करू इच्छितो. दोन्ही देश चाबहार बंदराच्या विकासात देखील सामील आहेत.

 

 

मैत्रीचे ३ फायदे : भारत मध्य -आशियाई राष्ट्रांशी जोडला जाणार

चाबहार : भारतासाठी चाबरहार बंदर अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामाध्यमातून अफगाणिस्तान, रशियासोबत मध्य आशियातील इतर देशांशी भारत जोडल्या जाणार आहे. त्यामुळे या देशांतून भारताला तेल व अन्य सामानांची आयात-निर्यात करणे सोपे होणार आहे. भारताने अफगाणिस्तानातील जरांजपासून देलारामपर्यंतचा रस्ता बनवला आहे.

 

 

अॅक्ट ईस्ट पॉलिसी : गुजरातच्या कांडला बंदराहून जहाज केवळ ६ दिवसांत चाबहारपर्यंत पोहोचते. तेथून रेल्वे किंवा रस्ते मार्गे सामान पुढे पोहोचवता येऊ शकते. अॅक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत भारत, म्यानमार, थायलंड दरम्यान रेल्वे संपर्क सुरू केली जाईल. मध्य-आशियातून येणारे सामानाला दक्षिण-पूर्व आशियाला पोहोचवण्यात सुलभता येऊ शकेल.

 

 

फरजाद गॅस ब्लॉक : आेएनजीसीने इराणच्या फरजादमध्ये तेल खाणीचा शोध घेतला आहे. भारताला तेथे गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. त्यामुळे माफक दरात गॅस उपलब्ध होऊ शकेल. भारत, आेमनमधून १,१०० किमी लांबीची गॅस पाईपलाइन आणू इच्छितो. आेमनमधून इराणद्वारे वाहिनी आणणे महागडे ठरू शकते. 

बातम्या आणखी आहेत...