आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीने जाहीर केली दंड जमा न करणाऱ्या १,६९० थकबाकीदारांची यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सेबीने दंड जमा न करणाऱ्या १,६९० थकबाकीदारांची यादी जाहीर केली. यात व्यक्तींसह कंपन्यांचाही समावेश आहे. मेपर्यंत त्यांना दंड भरण्याची मुदत होती. १५ हजार रुपयांपासून कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्यावर नोंदणी केल्याविना पोर्टफोलिआे मॅनेजमेंट सेवा देणे, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे समाधान न करणे व अवैधपणे गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करणे आदी प्रकरणांत दंड भरण्याचे आदेश दिले होते. 


चंदा कोचर यांना १ कोटीपर्यंतचा दंड शक्य 
व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिल्याप्रकरणी सेबी आयसीआयसीआय बँक व एमडी-सीईओ चंदा कोचर यांना दंड ठोठावू शकते. या प्रकरणात दुहेरी हितसंबंध असल्याचे सेबीच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...