आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार सक्ती: आज न्यायालयात अंतरिम निकाल; वैधतेवर 17 जानेवारीपासून सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विविध सरकारी सेवा व योजनांसाठी आधार सक्तीचे करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणा ऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी अंतरिम निकाल देणार आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने या प्रकरणी सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला. दरम्यान, आधार कायद्याच्या वैधतेबाबत घटनापीठ १७ जानेवारीपासून सुनावणी करेल.


दरम्यान, विविध याेजनांशी आधार लिंक करण्यासाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले. ही सुनावणी सुरू असताना याचिकाकर्त्यांचे वकील शाम दिवाण म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की बाथरुमला जाण्यासाठी पण आधार क्रमांक द्यावा लागेल.’ यावर सरन्यायाधीशांनी त्यांना फटकारत ‘भाषणबाजी आणि अतिशयोक्तीऐवजी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करा,’ असे सुनावले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. दिवाण यांच्यासह गोपाल सुब्रह्मण्यम, अरविंद दातार, के. टी. एस. तुलसी, आनंद ग्रोवर यांनी युक्तिवाद केले.

बातम्या आणखी आहेत...