आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलच्या सहसंस्थापकांच्या मते, भारतीयांत सर्जनशीलता नाही;आनंद महिंद्रा म्हणाले, पुढल्या वेळी या, मत बदलू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय लोक खूप अभ्यास करतात, एमबीए होऊन मर्सिडीझ घेतात, पण सर्जनशीलतेत ते मागे असल्याचे वक्तव्य अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांनी केले. मात्र महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी टि्वट करून त्यांना सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, परंपरावादी लोकांना चुकीचे ठरवणे आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहिले आहे. पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा तुमचे भारतीयांबद्दलचे मत नक्कीच बदलून दाखवू.

 

भारतीय लोक मर्यादित विचार करणारे व नवनिर्माणाचा ध्यास नसणारे आहेत, असे वक्तव्य वोजनियाक यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान केले होते. महिंद्रा यांनी याचा चांगलाच समाचार घेतला. १९७६ मध्ये वोजनियाक यांनी स्टीव्ह जॉब्जसोबत अॅपल कंपनीची पायाभरणी केली. जॉब्ज आणि वोजनियाक यांनी एकत्र येऊन अॅपल-१ संगणक तयार केला होता. स्टीव्ह जॉब्जच्या निधनानंतर आता स्टीव्ह वोजनियाक अॅपलमध्ये नाहीत. स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करत आहेत.

भारतीय लोक नोकरीसाठी एमबीए करतात

 

एका मुलाखतीत स्टीव्ह वोजनियाक म्हणाले, भारतीयांत नवनिर्माणाचा ध्यास नाही. खूप अभ्यास करून चांगली नोकरी मिळवण्याचे त्यांचे ध्येय असते. त्यासाठी सर्वच नामांकित महाविद्यालयात एमबीए करतात. त्यामुळेच भारतात गुगल, फेसबुक किंवा अॅपलसारखी मोठी कंपनी नाही. उल्लेखनीय म्हणजे भारतीयांना नावे ठेवणाऱ्या स्टीव्ह यांची एकूण संपत्ती ६४९ कोटी तर त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या आनंद महिंद्रांची संपत्ती १० हजार कोटींची आहे. 

 

 

नवनिर्माणाच्या क्षेत्रात भारताची स्थिती

दर्जेदार नवनिर्मितीत दुसऱ्या स्थानावर

२०१७ च्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सनुसार भारताची स्थिती...
- इनोव्हेशन इंडेक्समध्ये १३० देशांत भारत ६०व्या स्थानावर. मागील क्रमवारीच्या तुलनेत ६ स्थानांची सुधारणा

- ग्लोबल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये १४ व्या स्थानी

- ऑनलाइन सक्रियतेमध्ये २७ व्या क्रमांकावर

- सर्जनशील वस्तूंची आयात करणाऱ्यांमध्ये १८ व्या स्थानी
- नवनिर्माणाच्या गुणवत्तेत दुसऱ्या स्थानी

 

बातम्या आणखी आहेत...