आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाभियोग: काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर हैदराबाद दौरा अर्धवट सोडून परतले उपराष्ट्रपती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेससह ७ विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरुद्ध दिलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषद घेतली. सरन्यायाधीशांनी न्यायालयीन कामातून बाजूला व्हायला हवे, अशी मागणी काँग्रेसने केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी हैदराबाद दौरा अर्धवट सोडून दिल्ली गाठली व प्रस्तावाच्या दिशेने कार्यवाही सुरू केली.

 

नायडूंनी अॅटर्नी जनरल वेणुगाेपाल, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, माजी विधी सचिव पी. के. मल्होत्रा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आदींशी घटनात्मक मुद्द्यांवर चर्चा केली.

 

प्रस्ताव फेटाळला तर कोर्टात जाणार
राज्यसभेचे अध्यक्ष नायडू यांनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला तर काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. अध्यक्षांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.

 

महाभियोग प्रस्तावाचे राजकीय पक्षांचे हे पाऊल आत्मघातकी.
- न्या. बी. सुदर्शन रेड्डी, 
माजी न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्ट


सर्वोच्च न्यायपालिकेस संकटांचा सामना करावा लागत आहे हे दुर्दैव.
- न्या. टी. एस. ठाकूर, माजी न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्ट

 

बातम्या आणखी आहेत...