आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वर्ष 2014-16 दरम्यान वार्षिक 6 टक्के घट झाल्याची नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खत आणि विजेवर सबसिडी दिल्यानंतरही शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नात २०१४-१६ दरम्यान वार्षिक सहा टक्क्यांच्या दराने घट नोंदवण्यात आली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (इक्रियर) यांच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

 

कृषी क्षेत्रातील सुधारणांमध्ये तेजी आणण्यासाठी धोरणात्मक साहसी निर्णय घेण्याचा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे. शेतीसाठीच्या जमिनीचा छोटा आकार, कमी उत्पादकता, जलवायूसमोरील आव्हान, नैसर्गिक साधनावरील दबाव, खाद्य सुरक्षा आणि अल्पविकसित अन्न प्रक्रिया उद्योग तसेच किरकोळ विक्री क्षेत्रातील समस्या यात मांडण्यात आल्या आहेत.  
सुरुवातीला आेईसीडीच्या अभ्यासाच्या पद्धतीला आमचा आक्षेप होता मात्र, या अहवालाच्या लेखकांनी या संबंधी चर्चा केली असल्याचे अहवाल जाहीर करताना वाणिज्य सचिव रिता तेवतिया यांनी सांगितले. भारतात कृषी क्षेत्रा संबंधित धोरण बनवण्याचे तसेच ते लागू करण्याचे काम संस्थांच्या किचकट प्रणालीच्या वतीने तयार करण्यात येत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्यांतील धोरण ठरवणारे एकमेकांसोबत बसून चर्चा करून त्यातून धोरण तयार करतील अशी कोणतीच व्यवस्था भारतात नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

 

अहवालात मांडण्यात आलेल्या शेतीसमोरील समस्या

- शेतीच्या जमिनीचा छोटा आकार
- पिकांची कमी उत्पादकता
- जलवायूसमोरील आव्हान
- नैसर्गिक साधनांवर असलेला दबाव
- सर्वांची खाद्य सुरक्षा
- अल्पविकसित प्रक्रिया उद्योग
- किरकोळ विक्री क्षेत्रातील समस्या
- धोरणातील अडचणी

 

मोठ्या खरेदीदारांना सरकार विकणार ८० लाख टन गहू  

गव्हाचा साठा कमी करण्यासाठी सरकारने खुल्या बाजारात सेल योजनेच्या माध्यमातून (ओएमएसएस) ७० ते ८० लाख टन गव्हाची विक्री करण्याचा विचार केला आहे. या गव्हाची किंमत १,८९० रुपये क्विंटल असेल. हा गहू गव्हाच्या पिठाची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि इतर मोठ्या खरेदीदारांना करण्यात येणार आहे. सरकारने मागील वर्षी ओएमएसएसच्या अंतर्गत ५४ लाख टन गहू १,७९० रुपयाच्या दराने विक्री करण्यासाठी ठेवला होता. मात्र, यातील केवळ १५ लाख टन गव्हाची विक्री झाली होती. एक जून रोजी सरकारकडे ४४० लाख टन गव्हाचा साठा होता. एफसीआयने २०१७-१८ मध्ये ३५५ लाख टन गव्हाची खरेदी केली होती. तिसऱ्या अंतिम अंदाजानुसार २०१७-१८ या हंगामात (जुलै ते जून) ९८५ लाख टन गहू उत्पादित होण्याचा अंदाज आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...