आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ गुहा शांतता क्षेत्र घाेषित; जयघोष, मंत्रोच्चारही बंद; घंटी वाजवण्यासही बंदी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बुधवारी अमरनाथ गुहेला ‘शांतता क्षेत्र’ घोषित केले. आता येथे भाविक जयघोष करू शकणार नाहीत, घंटी वाजवता येणार नाही, मंत्रोच्चारही करता येणार नाही. शांतता क्षेत्र घोषित केल्याने हिमस्खलन रोखणे व निसर्गाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल, असे लवादाचे म्हणणे आहे.  


दर्शनात अडचण येऊ नये म्हणून हिमलिंगासमोरची लोखंडी जाळी हटवण्याचे आदेशही देत पर्यावरणाला धोका न पोहोचवता भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही एनजीटीने सांगितले. सुविधांबाबत पर्यावरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तीन महिन्यांची कृती योजनाही मागवली

 

गुहेत साहित्य नेण्यावर बंदी; पायऱ्यांवर तपासणी  
एनजीटीने गुहेत मोबाइलसह साहित्य नेण्यावर बंदी घातली. प्रवेश केंद्रावर तपासणी होईल. भाविकांना सामान ठेवण्यासाठी मंदिराने व्यवस्था करावी, असे एनजीटीने म्हटले आहे. पायऱ्यांपासून गुहेच्या आतपर्यंतचा भाग शांतता क्षेत्रात समाविष्ट असेल.

बातम्या आणखी आहेत...