आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यकारिणीत रजनी पाटील, सातव; थाेरातांची वर्णी, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय यांना अर्धचंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी युवा आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करत पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गजांना अर्धचंद्रही देण्यात आला आहे. समितीत २३ सदस्य, १८ स्थायी सदस्य आणि १० आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून कार्यकारिणीवर खासदार राजीव सातव, खासदार रजनी पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, दिग्विजयसिंह, कमलनाथ, मोहन प्रकाश यांना अर्धचंद्र देण्यात आला आहे. 


राहुल यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांनी १६ फेब्रुवारी २०१८ला काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून तिचे संचालन समितीत रूपांतर केले होते. २३ सदस्यीय कार्यकारिणीत राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, सिद्धरामय्या आदींचा समावेश आहे. 


स्थायी आमंत्रितांत शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योदिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, राजीव सातव यांचा समावेश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...