आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • उपोषण करणाऱ्या केजरींच्या मंत्र्यांचे वजन वाढले Arvind Kejriwal His Colleagues Protest In Lt Governor House Sixth Day

केजरीवालांच्या समर्थनार्थ चार बिगर भाजप मुख्यमंत्री; चौघांनाही केजरींना भेटण्याची परवानगी नाकारली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहा दिवसांपासून उपराज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी चार बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे एच.डी. कुमारस्वामी व केरळच्या पी. विजयन यांनी रात्री दहा वाजता पत्रपरिषद घेतली. दिल्लीत घटनात्मक संकट असून लोकनियुक्त सरकारला काम करू द्यावे, असेही त्यांनी सांगितले. 


ममता म्हणाल्या,४ महिन्यांपासून दिल्लीचे कामकाज ठप्प आहे. मोदी दिल्लीची एक छोटीशीही समस्या सोडवू शकत नसतील तर देशाचे काय? मोदींनी हस्तक्षेप करून गुंता सोडवावा. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांच्या संपाच्या बहाण्याने केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती शासन चालवत असल्याचा आराेप अरविंद केजरीवाल यांनी केला. 

 

आज नीती आयोगाची बैठक, केजरीवाल-मोदी समोरासमोर
तत्पूर्वी, केजरीवाल यांनी संकेत दिले की ते रविवारी होत असलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. बैठकीत त्यांचा मोदींशी सामना होऊ शकतो. केजरीवाल यांनी एका पत्रकाराचे ट्विट री-ट्विट केले. त्यात म्हटले होते की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर नायडू, ममता, केजरीवाल व कुमारस्वामींची भेट होईल.

 

महाआघाडी होण्याआधीच  िवरोधी पक्षांत फुटीचे चिन्ह
२०१९ मध्ये भाजपविरोधी महाआघाडीच्या पार्श्वभूमीवर या मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याला मोठे महत्त्व आहे. आघाडीचे नेतृत्व करू पाहणाऱ्या काँग्रेसने केजरींच्या आंदोलनावर सडकून टीका केली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापणारे कर्नाटकचे कुमारस्वामी यांनीही केजरींना समर्थन दिले आहे. यामुळे हे तेथेही आलबेल नसल्याचे संकेत आहेत.  

 

चारही मुख्यमंत्र्यांना केजरींना भेटण्याची परवानगी नाकारली

पत्रकार परिषदेआधी चारही मुख्यमंत्र्यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहिले. यात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी मागितली हाेती. मात्र ती नाकारण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. यानंतर चौघा मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत पाठिंबा दिला.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, का सुरु आहे धरणे-उपोषण 

 

बातम्या आणखी आहेत...