आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीश मिश्रा यांची नाराज 4 न्यायमूर्तींसाेबत 15 मिनिटे चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी मंगळवारी कामकाज सुरू होण्याआधी चहापानाच्या वेळी न्या. चेलमेश्वर,  न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्याशी १५ मिनिटे त्यांच्या चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती न्यायालयातील सूत्रांनी दिली. 

 

सरन्यायाधीश आणि चारही न्यायमूर्तींमध्ये बुधवारी दीर्घ चर्चा होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. न्यायाधीशांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन व बार कौन्सिल ऑफ इंडियाने वेगवेगळे मत व्यक्त केले. तर भाजप आरएसएसच्या आडून न्यायपालिकेवर हल्ला करत आहे. ज्येष्ठ न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे समाधान व्हावे, असे काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणाले.

 

वाद मिटला नाही
चार ज्येष्ठ जजनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे निर्माण झालेला वाद अजून शमलेला नाही. वादावर पडदा पडण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील.
- के.के. वेणुगोपाल, महाधिवक्ता.


या अठवड्यात मिटेल प्रकरण 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) चे अध्यक्ष विकास सिंह म्हणाले की, या आठवड्याच्या अखेरीपर्यंत हे प्रकरण मिटण्याची शक्यता आहे. 
- आम्ही रविवारी सरन्यायाधीशांना भेटलो तेव्हा हे प्रकरण मिटले असे वाटले होते. सरन्यायाधीशांनाही हे प्रकरण आठवडाभरात मिटेल आणि सर्वकाही पूर्वीप्रमाणे होईल असे वाटते. 
- 4 वरिष्ठ न्यायाधीशांशी चर्चा झाली का असे विचारले असता, आमची चर्चा झाली नाही, पण काही दिवसांत सर्व ठीक होण्याची शक्यता असल्याचे वेणुगोपाल म्हणाले. 


सरन्यायाधीशांनी बनवले कॉन्स्टीट्यूशनल बेंच, पत्रकार परिषदेतील 4 पैकी एकाचाही समावेश नाही 
- चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टातील महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी एका घटनापीठाची स्थापना केली. 
- या घटनापीठात केस अलॉटमेंट आणि SC च्या कामावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या चार सिनियर जजला स्थान मिळाले नाही. या चारही जजेसने सोमवारी कोर्ट अटेंड केले होते. त्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने हा वाद मिटला असल्याचे म्हटले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...