आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्नजी दुसऱ्यांनी \'खामोश\' म्हणावे अशी वेळ का आणतात, तीन तलाक देऊन BJP सोडावी - सुप्रियो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, भाजप माझ्यासोबत सावत्र मुलाचासारखा व्यवहार करत आहे. - Divya Marathi
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, भाजप माझ्यासोबत सावत्र मुलाचासारखा व्यवहार करत आहे.

नवी दिल्ली - शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजपला नियमित दिल्या जाणाऱ्या घरच्या आहेराला शनिवारी घरातूनच उत्तर मिळाले आहे. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी सिन्हांवर पलटवार केला आहे. यशवंत सिन्हा यांच्या 'राष्ट्रीय मंच' या अराजकीय संघटनेत सहभागी होणे आणि वादग्रस्त वक्तव्य करणे यावर बाबुल सुप्रियो म्हणाले, 'तुमच्या मनात जर एवढाच राग आहे तर रोज संसदेत येऊन कशाला बसता? तीन तलाक घ्या आणि स्वतःला भाजपपासून वेगळे करा.' शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की भाजप माझ्यासोबत सावत्र मुलासारखे वागत आहे. माझ्याकडे बोलण्याशिवाय दुसरे कोणतेही काम दिले नाही. सिन्हा यांचे पक्षासोबतचे संबंध काही काळापासून बिघडले आहेत. ते अजूनही पक्षामध्ये आहेत आणि पाटणा साहेब येथून खासदार आहेत. 


 एवढा राग आहे तर भाजपला तीन तलाक द्या... 
 - बाबुल सुप्रियो म्हणाले, शत्रुघ्न सिन्हा यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर एवढाच पक्षाचा राग येत असेल तर संसदेत येऊन कशाला बसता?
अशी परिस्थिती का निर्माण करता की दुसऱ्यांना तुम्हाला 'खामोश' म्हणावे लागेल. ड्रेसिंग रुममधील गप्पा तिथेच ठेवल्या पाहिजे. तुम्ही तीन तलाक द्या, आणि स्वतःला भाजपपासून वेगळे करुन घ्या. 

 

आता मोकळा श्वास घेत आहे - शत्रुघ्न सिन्हा 

- यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेली अराजकीय संघटना 'राष्ट्रीय मंच'मध्ये शत्रुघ्न सिन्हा सहभागी झाले आहे. यशवंत सिन्हा हे अनेकवेळा मोदी सरकारवर टीका करत आले आहेत. या अराजकीय संघटनेत सहभागी झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी न्यूज एजन्सीला मुलाखत दिली होती. 
- सिन्हा शुक्रवारी म्हणाले होते, मी सांगू शकत नाही की आज मला किती मोकळे आणि स्वतंत्र झाल्या सारखे वाटत आहे. मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा आनंद वेगळाच असतो. आता मी देशाच्या भल्यासाठीही काम करु शकेल. माझे मत खुलेपणाने मांडता येईल. 
- जेव्हा त्यांना विचारण्यात आले की भाजपने तुम्हाला कधी बोलण्यापासून रोखलेले नाही, त्यावर ते म्हणाले, 'त्यांनी बोलण्याशिवाय माझ्याकडे दुसरे कामही दिलेले नाही. माझे पालकत्व असल्या पक्षाने माझ्यासोबत सावत्र मुलासारखा व्यवहार केला आहे.'

 

देशहितासाठी उचलले पाऊल...

राष्ट्रीय मंचच्या उद्घाटनावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, होते की या फ्रंटमध्ये सहभागी झालो त्याचे कारण पक्षामध्ये आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य नाही. मात्र त्यांनी हे देखील स्पष्ट केले ही याकडे पक्ष विरोधी कारवाई म्हणून पाहू नये. हे देशहितासाठी उचललेले पाऊल आहे. 

बातम्या आणखी आहेत...