आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींविरोधात हक्‍कभंग प्रस्‍ताव आणणार भाजप, खोटी माहिती देत दिशाभूल केल्‍याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधींविरोधात भाजप हक्‍कभंग प्रस्‍ताव आणणार, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी दिली आहे. आज शुक्रवारी लोकसभेत खोटी माहिती देऊन त्‍यांनी सभागृहाची दिशाभूल केली, असा आरोप त्‍यांच्‍यावर करण्‍यात आला आहे. मात्र हा हक्‍कभंग प्रस्‍तावर नेमका केव्‍हा आणला जाणार हे अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकले नाही.


राहुल यांचे मोदी सरकारवर 5 आरोप
1) संरक्षण मंत्री खोटे बोलल्‍या
आज पावसाळी अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवशी मोदी सरकारवर हल्‍लाबोल करताना राहुल म्‍हणाले, 'येथे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण बसल्‍या आहेत. त्‍यांनी पूर्वी आश्‍वासन दिले होते की, राफेल विमानांची किंमत ते सभागृहाला सांगतील. मात्र नंतर आपल्‍या विधानावरून त्‍या पलटल्‍या. फ्रान्‍ससोबत झालेल्‍या करारामुळे याबाबतची माहिती देता येणार नाही', असे त्‍या म्‍हणाल्‍या. मात्र मला स्‍वत: फ्रान्‍सच्‍या राष्‍ट्रपतींनी सांगितले की, 'करारामध्‍ये असे काहीही नाही, ज्‍यामुळे विमानांची किंमत भारत सरकारला सांगता येणार नाही.' म्‍हणजेच नरेंद्र मोदींच्‍या दबावामुळे निर्मला सीतारमण देशाशी खोटे बोलल्‍या.


2) पंतप्रधान फक्‍त जुमलेबाजी करतात
मोदींवर हल्‍लाबोल करताना राहुल म्‍हणाले की, पंतप्रधान फक्‍त खोटी जुमलेबाजी करतात. त्‍यांचा जुमला नंबर 1 होता की, देशात सर्वांच्‍या बँक खात्‍यात 15 लाख रुपये जमा करू. जुमला नंबर 2- दोन कोटीं युवकांना रोजगार मिळेल. मात्र प्रत्‍यक्षात आतापर्यंत केवळ 4 लाख युवकांनाच ते रोजगार देऊ शकले. चीनमध्‍ये दर 24 तासाला 50 हजार युवकांना रोजगार मिळतो तर भारतात केवळ 400 युवकांना रोजगार मिळतो. ही आहे देशातील खरी परिस्थिती.

 

3) भांडवलदारांशी संबंध
प्रधानमंत्रींचे भांडवलदारांशी काय संबंध आहेत, मोदींच्‍या मार्केटिंगसाठी एवढा पैसा कुठून येतो, हे सर्वांनांच माहिती आहे. त्‍याबदल्‍यात या भांडवलदारांना हजारो कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिला जातो. मोदींना माहित आहे, हे मी खरे बोलतोय. त्‍यामुळे यावेळी ते माझ्याकडे थेट नजरेने पाहू शकत नाहीत.


4) दलित-आदीवासींवर अत्‍याचार, मोदी मौन
यावेळी राहुल यांनी मोदींना विचारले की, दलित-आदिवासी भारतीय नाहीत का? त्‍यांच्‍यावर अत्‍याचार होतात तेव्‍हा मोदी एक शब्‍दही बोलत नाही. याउलट त्‍यांचे मंत्री हल्‍लेखोरांचे हार घालून स्‍वागत करतात. हा हल्‍ला केवळ त्‍या व्‍यक्‍तीवरच नसून बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संविधानावर व या संसदेवर आहे.


5) छोट्या दुकानदारांच्‍या घरी इन्‍कम टॅक्‍स ऑफीसरला पोहोचवले
मोदींनी एका झटक्‍यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्‍यांना माहित नव्‍हते की, गरीब, शेतकरी, मजुर, छोटे दुकानदार यांचा सर्व व्‍यवहार रोखीवर चालतो. या निर्णायाची त्‍यांना जबरदस्‍त झळ पोहोचली. जीएसटी प्रथम कॉंग्रेसने आणले होते. तेव्‍हा गुजरातचे मुख्‍यमंत्री असलेल्‍या मोदींनी याचा विरोध केला होता. मात्र आता त्‍यांनी प्रत्‍येक छोट्या दुकानदारांच्‍या घरी इन्‍कम टॅक्‍स ऑफीसरला पोहोचवले आहे.       

 

बातम्या आणखी आहेत...