आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार संपल्यानंतर राहुल गांधींची चॅनल्‍सवर मुलाखत, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांनी या मुलाखतीत एकतर्फी विजयाचा दावा केला होता. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. - Divya Marathi
राहुल गांधी यांनी या मुलाखतीत एकतर्फी विजयाचा दावा केला होता. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका मुलाखतीवरून प्रचंड वादंग माजले. बुधवारी दुपारी १ वाजता राहुल यांची मुलाखत गुजरातमधील तीन स्थानिक टीव्ही वाहिन्यावर प्रसारित झाला. यात त्यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत काँग्रेसचा एकतर्फी विजय होणार असल्याचा दावा केला.

 

यावर भाजपने हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा करत निवडणूक आयाेगाकडे तक्रार केली. यावर आयोगाने सायंकाळी ७.३० वाजता मुलाखत प्रसारित करणा ऱ्या वाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. राहुल यांनाही नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले. यावर काँग्रेसने प्रत्युत्तर देत माध्यमांची ही मुस्कटदाबी असल्याचे सांगितले. २०१४च्या निवडणुकीत नियमांचा भंग करणारे पंतप्रधान मोदी व भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसच्या नेत्यांवर याबाबत रात्री निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत याचा निषेध नोंदवला.

 

बुधवारी दिवसभरातील घटनाक्रम असा

> १. पीयूष गोयल, दुपारी ३.२० वा. : मतदानापूर्वी ४८ तासांत मुलाखतीची परवानगी नाही. आयोगाने दखल घ्यावी. अंितम टप्प्यातील मतदानापूर्वी ४८ तासांत मुलाखतीची परवानगी नाही. आम्ही अशा मुलाखती कधी दिल्या नाहीत. राहुल गांधी यांची ही मुलाखत म्हणून गुजरातमधील पराभवाच्या भीतीने नैराश्यातून उचललेले पाऊल आहे. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. (केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.)

 

> २. रणदीप सुरजेवाला, सायं. ५.३० वा. २०१४ मध्ये मुलाखत देणाऱ्या मोदींवर कारवाई व्हावी.
२०१४मध्ये मतदानापूर्वी एक दिवस मोदी यांनी वाहिनीला मुलाखत दिली होती. राहुल यांनी आचारसंहितेचा भंग केला. तर मोदींवरही आयोगाने कारवाई करावी. राहुल यांच्या मुलाखतीमुळे भाजप घाबरला आहे. मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांना गुजरातचे मुख्यमंत्री व भाजप धमकावत आहेत. त्यांच्यावरही कारवाई व्हावी. (काँग्रेस प्रवक्त्यांनी टीव्हीवर मागणी केली)

 

> ४. काँग्रेस, रात्री ९.१५ वा. : आयोगाची घेतली भेट, कारवाईचे दुहेरी निकष अमान्य
२०१४ मध्ये मतदानाच्या पूर्वी मोदींनी अनेक वाहिन्यांवर मुलाखती दिल्या. भाजपाचे चिन्ह दाखवले गेले. त्यावेळी आयोगाने कारवाई केली नाही. अमित शाह यांनी आज मुलाखत दिली. पीयूष गोयल यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान ‘फिक्की’च्या कार्यक्रमात राजकीय भाषण देतात. त्यांच्यासाठी एक न्याय आणि आमच्यासाठी वेगळा का?

 

> ३. निवडणूक आयोग, ७.३० व ८.४० वा. : दोन प्रसिद्धी पत्रके काढली. राहुल यांना नोटीस बजावली. आयोगाने मुलाखतीची डीव्हीडी मागवली. ही मुलाखत लोक प्रतिनिधित्व कायदा १९५१ कलम १२६ (३) च्या निवडणूक विषयातील श्रेणीत येत असल्याचे स्पष्ट करून हे प्रसारण कलम १२६ (१) (ब) चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. वाहिन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. राहुल यांना नोटीस बजावून १८ डिसेंबरला उत्तर द्यावे, असे बजावले.

 

> काँग्रेसने केल्या चार मागण्या : १. चॅनलवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश परत घ्यावे. २. निर्णयाच्या आधी आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या भाजपवर एफआयआर दाखल करावा. ३. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोदी, जेटली, शाह, गोयल व इतर भाजप नेत्यांवर एफआयआर दाखल करावा. ४. मीडियाने वार्तांकन करताना नेत्यांचे मतदान करतानाचे फोटो लाइव्ह दाखवू नयेत, असे निर्देश द्यावेत.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

हेही वाचा,

- भाजपच्या मार्गदर्शकास राहुल गांधींचे 'मार्ग'दर्शन; संसद परिसरात सत्ताधारी, विराेधक एकत्र

- भाजपने पैशाचा वापर करून माझी प्रतिमा बिघडवली: राहुल गांधी यांचा आरोप

बातम्या आणखी आहेत...