आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp New Headquarter Inauguration Narendra Modi Amit Shah Advani News And Updates

भाजप 34 वर्षांनी नव्या मुख्यालयात; हे सर्वात मोठे पक्ष कार्यालय : पक्षाध्यक्ष अमित शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपचा पत्ता बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या नव्या मुख्यालयाचे उद््घाटन केले. पक्षाचे हे नवे कार्यालय ६, दीनदयाळ उपाध्याय मार्गावर तयार झाले आहे. ते लाल दगडांनी तयार केले आहे. त्यासाठी १८ महिने लागले. या कार्यालयात सर्व आधुनिक सेवा आहेत. हे देशातील कुठल्याही पक्षाचे सर्वात हायटेक कार्यालय आहे.


कार्यालय विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल मोदींनी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले की, आज श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल. त्यांनी जे बी लावले होते त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. भाजप १००% लोकशाहीवादी पक्ष आहे. निर्णय घेण्यापासून तो लागू करण्यात लोकशाही आहे. आमचा पक्ष देशभक्तीच्या रंगात रंगला आहे. अटलजींच्या नेतृत्वात भाजपने रालोआचा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. हे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे कार्यालय आहे.

 

पक्षाध्यक्षांचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर

 

भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, हे जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वात मोठे कार्यालय आहे. त्याच्या तळमजल्यावर भाजप आणि जनसंघाशी संबंधित नेत्यांची छायाचित्रे लावली आहेत. तेथेच आठ प्रवक्त्यांसाठी कक्ष तयार केले आहेत. अध्यक्षांचे कार्यालय इमारतीच्या सर्वात वरच्या भागात आहे. दुसऱ्या मजल्यावर पक्षाचे इतर नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्षांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

 

 

लुटियन्स सोडणारा भाजप पहिला पक्ष

आतापर्यंत भाजपचे मुख्यालय ११, अशोक रोडवर होते. सध्याच्या या कार्यालयाची जागा भाजप सरकारला परत करणार असल्याचे सांगितले जाते. ही जागा सरकारतर्फे भाजपचे कार्यालय चालवण्यासाठी देण्यात आली होती. लुटियन्स झोनबाहेर आपले कार्यालय स्थलांतरित करणारा भाजप हा पहिला राष्ट्रीय पक्ष आहे. राजकीय पक्षांची कार्यालये लुटियन्स झोनबाहेर असावीत, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे.

 

 

कमळाच्या संकल्पनेवर तयार झाली आहे नवीन इमारत

- पक्ष मुख्यालयात तीन ब्लॉक आहेत. मुख्य इमारत सात मजली आहे.
- इतर दोन्ही इमारती तीन-तीन मजल्याच्या आहेत. वाय-फायने सज्ज.
- इमारतीत सौर पॅनल आणि बायो टॉयलेटही बनवले आहेत.
- २०० कारसाठी भूमिगत पार्किंगची व्यवस्था आहे.
- इमारत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
- परिसरात कमळाच्या संकल्पनेवर एक तलावही बनवला आहे.
- परिसरात तीन इमारती आहेत. तेथे वाचनालय, संशोधन कक्ष आहे.
- इमारतीत जल फेरभरणाचीही व्यवस्था आहे.
- भाजपचे नवे कार्यालय निवडणूक वॉर रूमसारखे आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो....

 

 

 

बातम्या आणखी आहेत...