आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जज लोया प्रकरणावर अमित शहा म्हणाले- सर्व आरोप तथ्यहिन, काँग्रेस-विरोधकांनी मला टार्गेट केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित शहा म्हणाले, जज लोया, इशरत जहाँ आणि सोहराबुद्दीन शेख प्रकरणी त्यांनी मला टार्गेट केले होते. (फाइल) - Divya Marathi
अमित शहा म्हणाले, जज लोया, इशरत जहाँ आणि सोहराबुद्दीन शेख प्रकरणी त्यांनी मला टार्गेट केले होते. (फाइल)

नवी दिल्ली - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआय कोर्टाचे जज बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले, या प्रकरणात करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार होते. मला लक्ष्य करुन हे आरोप करण्यात आले होते. आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, तो तरी काँग्रेसने मान्य करावा. का राहुल गांधींची इच्छा आहे की कोर्टाने काँग्रेस कार्यालयातच बसावे? शहा म्हणाले, राजकीय लढाई ही जनतेमध्ये लढली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी म्हटले होते, की जज लोया यांचा मृत्यू नैसर्गिक होता. राजकीय षडयंत्रांतर्गत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

 

काँग्रेसने न्यायपालिकेचा सन्मान करावा 
- रिपब्लिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले, 'जज लोया मृत्यू प्रकरण तथ्यहिन होते. यात काही लोकांनी गंभीर आरोप केले होते. न्यायपालिका, सरकार आणि माझ्यावरही आरोप होते. सुप्रीम कोर्टाने 10 दिवस या प्रकरणी सुनावणी केली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. देशाची जनता पाहात आहे. काँग्रेसने या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.'
- 'त्यांनी आधी चुकीचे आरोप करुन एक लेख लिहून घेतला. नंतर जजच्या बदलीचा दबाव आणला. कोर्टाने सुनावणीसाठी मोठा बेंच तयार केला. आताही जर ते कोर्टाचा निर्णय मान्य करणार नसतील तर त्यांना काँग्रेस कार्यालयात कोर्ट बसवायचे आहे का? न्यायपालिकेच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. त्यासाठी संविधानंतर्गत अपील करावे.'

 

इशरत जहाँ प्रकरणातही माझ्यावर आरोप - शहा 
- इशरत जहाँ प्रकरणाबद्दल शहा म्हणाले, 'या प्रकरणातही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निर्णय देण्यात आला. त्यात मला क्लीनचीट मिळाली. राहुल गांधींना विचारले पाहिजे की राजकीय लढाई जनेतमध्ये जाऊन आणि निवडणुकीच्या माध्यमातून का लढत नाही. माझे त्यांना सांगणे आहे की जनतेमध्ये जाऊन लढाई केली पाहिजे. यात पक्ष आणि नेते जनतेसमोर जाऊन आपले मुद्दे मांडतात आणि जनता ठरवते की कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पराभूत. या केसमध्ये मला थेट टार्गेट केले गेले होते.'

बातम्या आणखी आहेत...