आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोफोर्स घोटाळा: BJP नेत्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, खंडपीठाची विचारणा- तुमचा उद्देश काय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोफोर्स तोफा खरेदती दलाली दिल्याचा आरोप झाला होता. - Divya Marathi
बोफोर्स तोफा खरेदती दलाली दिल्याचा आरोप झाला होता.

नवी दिल्ली - बोफोर्स घोटाळ्यावरील याचिकेवर सुप्रीम कोर्टा शुक्रवारी सुनावणी करणार आहे. तोफाच्या खरेदीमध्ये 64 कोटी रुपये दलाली दिल्या प्रकरणी भाजप नेते आणि वकील अजय अग्रवाल यांनी याचिका दाखल केली आहे. मागील सुनावणीवेळी कोर्टाने विचारले होते, की थर्ड पार्टी म्हणून याचिका दाखल करण्यामागे तुमचा उद्देश काय आहे? 

 

भारतीय लष्कराने 1986 मध्ये 400 तोफा खरेदी करण्याचा करार केला होता. यामध्ये इटलीचा व्यापारी ओत्तावियो क्वात्रोची याला मोठी दलाली मिळाली होती. काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या या घोटाळ्याचा राजीव गांधी यांच्यासोबत काही संबंध नसल्याचे पक्षाने नेहमी म्हटले आहे. CBI चौकशीनंतर दिल्ली हायकोर्टाने 2004 मध्ये राजीव गांधी यांना क्लीन चिट दिली होती.

 

सीजेआयसह 3 न्यायाधीशांचे खंडपीठ करणार सुनावणी 
- अग्रवाल यांनी 31 मे 2005 रोजी दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. तेव्हा कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश (सीजेआय) दीपक मिश्रा, जस्टिस ए.एम. खानविलकर आणि जस्टिस डी.वाय.चंद्रचूड यांचे खंडपीठासमोर होणार आहे. 

- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अजय अग्रवाली यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेलीतून निवडणूक लढवली होती.  

 

काय होता बोफोर्स घोटाळा?
- 1986 मध्ये भारताने स्विडनच्या शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यासोबत 155mm च्या 400 तोफांचा  करार केला होता. हा सौदा 1.3 अब्ज डॉलरचा होता. (सध्याचा दराने जवळपास 8380 कोटी रुपये) स्वतंत्र भारतातील हा सर्वात मोठा मल्टिनॅशनल घोटाळा मानला जातो. 
- 1987 मध्ये उघड झाले होते की या करारासाठी भारताने 64 कोटी रुपयांची दलाली दिली होती. तेव्हा केंद्रामध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार होते. 
- स्विडनच्या रेडिओने सर्वात आधी 16 एप्रिल 1987 ला या करारात दलाली घेतली गेल्याचा खुलासा केला होता. बोफोर्स कंपनीकडून तोफा खरेदीचे हे प्रकरण असल्यामुळे बोफोर्स घोटाळा म्हणूनच त्याचे नाव पडले. या घोटाळ्याच्या आरोपानंतर 1989 मध्ये राजीव गांधींचे सरकार पडले होते. 
- ओलेफ पाल्मेची नंतर हत्या झाली होती. 

 

दलालीमध्ये कोणाचा रोल ? 
- आरोप होता की बोफोर्स घोटाळ्यात दलालाची भूमिका पार पाडणारा ओत्तावियो क्वात्रोची हा  राजीव गांधी यांच्या कुटुंबाचा निकटवर्तीय होता. त्यामुळे त्याला दलालीतील मोठी रक्कम मिळाली होती. दलाली घेण्यासाठी ए.ई. सर्व्हिसेस या नावाने एक बनावट कंपनी स्थापन करण्यात आली होती. क्वात्रोचीचा 2013 मध्ये मृत्यू झाला. 
- 1997 मध्ये सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याते आले होते. तपास पूर्ण होण्यासाठी 18 वर्षे लागली. या चौकशीवर 250 कोटी रुपये खर्च झाले. 
- सीबीआयने केलेल्या चौकशीनंतर दिल्ली हायकोर्टात झालेल्या सुनावणीत राजीव गांधी यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...