आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari कांडात Love अँगल! एका डायरीमध्ये प्रियांकाने केला आहे खास मित्राचा उल्लेख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या आत्महत्या प्रकरणात रोज काही तरी नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान तर वाढतच आहे, पण त्याचबरोबर या प्रकरणातील गूढही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता आणखी एक नवा अँगल या प्रकरणात समोर येतोय. हा अँगल म्हणजे लव्ह अँगल. या प्रकरणातील महत्त्वाचे नाव असलेल्या प्रियांकाने खासगी डायरीत तिच्या प्रेम प्रकरणाचा उल्लेख केला आहे. आता पोलिस या दिशेनेही तपास करत असल्याची माहिती मिळतेय. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये याचा खुलासा झाला आहे.   


प्रियांकाने ही डायरी अत्यंत सुंदर पद्धतीने सजवली असल्याचेही समोर येत आहे. डायरीचे कव्हर पेज हार्ट शेपमध्ये कापलेले आहे. हा कापलेला आकार सिल्व्हर रंगाच्या कागदाने सजवण्यात आलेला आहे. प्रियांकामने या डायरीमध्ये तिच्या जीवनातील काही खासगी क्षणांचा उल्लेख अगदी सविस्तरपणे केलेला आहे. मॉडेल टाऊन येथे राहणाऱ्या एका मुलाबरोबर असलेली तिची मैत्री आणि रिलेशनशिप याचा उल्लेख प्रियांकाने केला आहे. याच डायरीत प्रियांकाने या सर्वाबाबत मामा म्हणजे या प्रकरणातील प्रमुख ललित याची माफीही मागितली आहे. 


काय लिहिले आहे डायरीत.. 
- प्रियांकाची हा डायरी आकाराने लहान पण अत्यंत सुंदर असून त्यावर तिने तिच्या जीवनातील काही खासगी बाबी लिहिल्या आहेत. 
- प्रियांकाने सर्वात आधी लिहिले, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे कदाचित त्यामुळे मी तुमच्या नजरेतून उतरू शकते. 
- दुसऱ्या पानावर प्रियांकाने मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे नाव लिहित, तो मित्र असल्याचे सांगितले आहे. तो आता निघून गेला असल्याचेही प्रियांकाने लिहिले आहे. 
- त्यानंतर प्रियांकाने तिच्या मामाने म्हणजे ललितने तिला जीवनाविषयी दिलेल्या सल्ल्यांबाबत लिहिले आहे. 
- डायरीतील शेवटची काही पाने मात्र कोरीच आहेत


तपासाची नवी दिशा
या प्रकरणाचा तपास पोलिस आतापर्यंत फक्त तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेमुळे झालेली आत्महत्या यादिशेने करत होते. पण आता या नव्या अँगलने तपास होऊ शकतो. डायरी नेमकी कधीची आहे, त्यातील मजकूर कधी लिहिलेला होता, असा तपास पोलिस करू शकतात. कदाचित ही डायरी जुनी असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसा या मुलाला शोधून त्याची चौकशी करू शकतात. डायरीत उल्लेख असलेला तरुण प्रियांकाचा फक्त मित्र होता की त्यांचे नाते आणखी पुढे गेलेले होते, याचाही तपास पोलिस घेत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...