आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयने पी. चिदंबरम यांना केले आरोपी; एअरसेल-मॅक्सिस करारप्रकरणी पुरवणी आरोपपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुमारे ३५०० कोटी रुपयांच्या एअरसेल-मॅक्सिस व्यवहाराची चौकशी करणाऱ्या सीबीआयने गुरुवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची नावे आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी ३१ जुलैला पुरवणी आरोपपत्रावर विचार करणार आहेत. यामध्ये चिदंबरम यांच्याशिवाय आणखी १७ नावांचा समावेश आहे. यामध्ये काही निवृत्त व कार्यरत अधिकारीही आहेत.  


२००६ मध्ये अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी एका विदेशी फर्मला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्डाची (एफआयपीबी) मंजुरी कशी मिळवली होती, याची चौकशी सीबीआय करत आहे. वास्तवात हा अधिकार केवळ आर्थिक प्रकरणांच्या मंत्रिमंडळ समितीकडे होता. एअरसेल-मॅक्सिस व्यवहार व ३५० कोटी रुपयांच्या आयएनएक्स मीडिया प्रकरणाच्या चौकशीदरम्यान चिदंबरम यांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आली होती. सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते की, एफआयपीबी क्लिअरन्सशी संबंधित पैशाबाबत दोन वेळा देवाणघेवाणीची बाब समोर आली आहे.  


आरोपपत्रासाठी सीबीआयवर दबाव 
माझ्या व अधिकाऱ्यांविरोधात बिनबुडाचे आरोप ठेवण्यासाठी दबाव बनवण्यात आला आहे. आता हा खटला न्यायालयात आहे. मी सार्वजनिकरीत्या यावर कोणतीही टिप्पणी करणार नाही. मात्र, न्यायालयात लढेन.  
- पी. चिदंबरम

बातम्या आणखी आहेत...