आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Central Government To Amend Law For Death Penalty In Child Molestation Cases Below 12 Year Of Age

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'12 वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा, कायद्यात बदलाची प्रक्रिया सुरु\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रीम कोर्टात केंद्राने सांगितले की 12 वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे प्रयत्न सुरु आहे. - Divya Marathi
सुप्रीम कोर्टात केंद्राने सांगितले की 12 वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे प्रयत्न सुरु आहे.

नवी दिल्ली - देशात अल्पवयीन मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहाता केंद्र सरकारने बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यात (पॉक्सो अॅक्ट) महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय केला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सांगितले,की 12 वर्षांपर्यंतच्या मुलींवर दुष्कर्मा करणाऱ्या आरोपींना जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद केली जाईल. सुप्रीम कोर्टात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने हे उत्तर दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे. 

 

बदलाची प्रक्रिया सुरु 
- पॉक्सो अॅक्टमध्ये बदलाची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठापुढे केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले, की 12 वर्षांपर्यंतच्या मुलींसोबत दुष्कर्म करण्याच्या प्रकरणात सरकार जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा करण्याची तयारी करत आहे. 
- अॅड. अलख अलोक श्रीवास्तव यांनी यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी केंद्र सरकारच्यावतीने महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाचे उप-सचिव आनंद प्रकाश यांनी सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला. 

 

मेनका गांधींनी दिले होते संकेत 
- केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी नुकतेच म्हटले होते, की आम्ही पॉक्सो अॅक्टमध्ये संशोधनाचा विचार करत आहोत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. बालकांसोबत दुष्कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक असला पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...