आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांमध्ये प्रचलित निकाह हलाला प्रथेस सुप्रीम कोर्टात केंद्र सरकार करणार विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तीन तलाकनंतर केंद्र सरकार आता मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या निकाह हलाला प्रथेस सुप्रीम कोर्टात विरोध करेल. बहुविवाह आणि निकाह हलाला प्रथेच्या घटनात्मक वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ लवकरच सुनावणी सुरू करेल. 


कायदा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, सरकारच्या मते निकाह हलाला लैंगिक न्यायाच्या विरोधात आहे. यावर सरकारने आपले मत सुप्रीम कोर्टात मांडले आहे. मात्र, तेव्हा सुप्रीम कोर्टाने तीन तलाकवर निकाल दिला होता. 


काय आहे निकाह हलाला...?

यानुसार एखाद्या मुस्लिम पुरुषास तलाक दिलेल्या आपल्या पत्नीशी दुसऱ्यांदा विवाह करावयाचा असेल तर या महिलेने कुणाशी तरी विवाह करून तलाक घेतलेला असला पाहिजे. या प्रथेस सरकारचा विरोध आहे. 

बातम्या आणखी आहेत...