आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसतिगृहांतील SC-ST व मागास विद्यार्थ्यांना स्वस्तात रेशन, केंद्र सरकारची योजना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरातील विद्यार्थी वसतिगृहांसाठी स्वस्त रेशनची सुविधा केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. अनुसूचित जाती, जनजाती, इतर मागास व अल्पसंख्याक प्रवर्गातील दोनतृतीयांश विद्यार्थी-विद्यार्थिनी असलेल्या वसतिगृहांनी स्वस्त दरात रेशन पुरवठा केला जाणार आहे.

 

दरमहा, दरडोई १५ किलो तांदूळ, गहू या वसतिगृहांना पुरवण्यात येईल. अन्न पुरवठा व ग्राहक हक्कमंत्री रामविलास पासवान यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील वसतिगृहांमध्ये दरडोई ५.६५ रुपये प्रति किलो तांदूळ आणि ४ रुपये किलो गहू उपलब्ध करून दिला जाईल. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना याच दरात धान्य दिले जाते. या योजनेचा लाभ १ कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना होईल, असा विश्वास सरकारला आहे.  


या योजनेअंतर्गत १३ लाख टन धान्याचा पुरवठा केल्याचे पासवान यांनी सांगितले. सर्व मुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. अशा वसतिगृहांचा तपशील राज्यांकडे मागितला असल्याचे पासवान म्हणाले. योजनेची अंमलबजावणी त्वरित सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक वसतिगृहांमध्ये ठेकेदार अन्न पुरवठा करतात. त्यांना आता बाजार दर देण्याची गरज पडणार नाही.  

 

बातम्या आणखी आहेत...