आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीमध्ये फसवणूक, मुंबईत दोघे जण अटकेत,127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिसेस अॅक्ट अर्थात जीएसटी विभागाने मुंबईत शनिवारी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांवर बनावट जीएसटी इनव्हाॅइस देऊन सुमारे १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 


जीएसटी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील स्थानिक न्यायालयाने अमित उपाध्याय आणि असद अन्वर सय्यद या दोन आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.


एप्रिल २०१६ पासून जून २०१७ पर्यंतच्या काळात व्यापारी अमित उपाध्याय यांनी ४७ कोटी रुपयांचा सेवा कर मिळवला. मात्र, सेवा कर विभागात तो भरलाच नाही. एवढ्यावरच हा व्यापारी थांबला नाही. त्याने बनावट जीएसटी इन्व्हाॅइस काढून ७९.३८ 
कोटी रुपये कमावले. 


अमित उपाध्यायचा हा गोरखधंदा सुरू असताना त्याला असद अन्वर सय्यद याने साथ दिल्याने त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सय्यद हा व्यवसायाने संगणक अभियंता आहे. 

बातम्या आणखी आहेत...