आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीच्या दिवशीच पहाटे ५ वाजता न्या. चेलमेश्वर यांनी बंगला सोडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. हा त्यांच्या कार्यकाळाचा अखेरचा दिवस होता. परंतु त्यांनी पहाटे पाच वाजताच आपला बंगला सोडला. निवृत्तीनंतर आंध्र प्रदेशला आपल्या मूळ गावी जाण्याचे त्यांनी ठरवले होते. ४ तुघलक मार्गावरील त्यांच्या बंगल्यात शुक्रवारच्या अगोदरच सामानसुमानाची बांधाबांध सुरू होती. हे साहित्य दिल्लीहून रवाना झाले आहे. ते सहा वर्षांपूर्वी बंगल्यात राहायला आले होते. 


१२ जानेवारी २०१८ ते चर्चेत आले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात घेण्यात आलेल्या 'क्रांतिकारी' पत्रकार परिषदेचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्यांच्यासोबत न्यायमूर्ती रंजन गोगोई, एम. बी. लोकुर व कुरियन जोसेफही होते. तेव्हा चेलमेश्वर यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या गूढ मृत्यूच्या प्रकरणासह इतर खटल्यांच्या वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडले होते. काही महिन्यांपासून अयोग्य गोष्टी घडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू १ डिसेंबर २०१४ रोजी झाला होता. त्यानंतर १८ मे रोजी चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीश यांच्यासोबत डायस शेअर केला होता. सामान्यपणे दिल्लीत उच्च पद मिळाल्यानंतर आपल्या मूळ गावी परतत नाहीत. परंतु न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी या परंपरेचे पालन केले नाही. त्यांच्या अगोदर काही व्यक्तींनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मूळ गावी जाणे पसंत केले होते. त्यात दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्याशिवाय मेट्रोमॅन म्हणून परिचित असलेले श्रीधरनही आहेत. 


२०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले 
आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील मोव्या मंडलमध्ये २३ जून १९५३ रोजी जन्मलेले चेलमेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण मछलीपट्टण येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी चेन्नईतील लोयोला महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. १९७६ मध्ये विधीची पदवी संपादन केली होती. ३ मे २००७ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले होते. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती चेलमेश्वर १० ऑक्टोबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...