आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chinese Authorities Are Not Allowing Them To Take Holy Dip In The Mansarovar Lake

चीनी अधिकाऱ्यांनी कैलाश मानसरोवरात डुबकी मारण्याची नाही दिली परवानगी- भक्तांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्तांना मानसरोवरात डुबकी मारु दिली नसल्याचा आरोप होत आहे. - Divya Marathi
भक्तांना मानसरोवरात डुबकी मारु दिली नसल्याचा आरोप होत आहे.

नवी दिल्ली - कैलास मानसरोवर येथे पोहोचलेल्या यात्रेकरुंनी आरोप केला की चीनी अधिकाऱ्यांनी त्यांना मानसरोवरात डुबकी मारु दिली नाही. वास्तविक यावर चीनकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. याच महिन्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कैलाश मानसरोवर यात्रेबद्दल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली होती.   त्यानंतर चीनने यात्रेकरुंसाठी नाथूला मार्ग खुला करण्याची परवानगी दिली होती. याची माहिती स्वतः स्वराज यांनी दिले होते. 

 

डोकलाम वादानंतर बंद केला होता नाथूला पास 
- गेल्यावर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान जवळपास 72 दिवस डोकलाम वाद चिघळला होता. त्यानंतर चीनने कैलाश मानसरोवर यात्रेचा नाथूला पास बंद केला होता. 
- त्यानंतर याचवर्षी मेमध्ये सुषमांनी वांग यांच्यासोबत बातचीत केली होती. त्या म्हणाल्या होत्या, 'दोन्ही सरकारमध्ये तोपर्यंत संबंध सुधारु शकत नाही जोपर्यंत दोन्ही देशांतील नागरिकांचे एकमेकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होत नाही. गेल्यावर्षी यात्रे दरम्यान जेव्हा नाथूला पास बंद करण्यात आला होता, तेव्हा सर्वांना त्याचा धक्का बसला होता.'
- या बातचीतनंतर सुषमा स्वराज यांनी सांगितले, होते, मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की नाथुला पास उघडण्यात आला आहे. यात्रेकरुंसाठी हेल्पलाइनही सुरु करण्यात आली आहे. 

 

यावर्षी 1580 भाविक जाणार कैलाश यात्रेला 
- यावर्षी 1580 भाविक कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. यातील 50-50 भाविकांचे 10 जत्थे नाथुला दर्रा (सिक्किम) आणि 60-60 भाविकांचे 18 जत्थे पारंपरिक मार्ग लिपुलेख (उत्तराखंड) मार्गे आपला प्रवास पूर्ण करतील. 
- जूनमध्ये सुरु होणारी कैलाश मानसरोवर यात्रा चार महिने चालणार आहे. या यात्राचा ड्रॉ काढण्यापूर्वी भाविकांची वैद्यकीय चाचणी केली जाते. 18 वर्षांपासून पुढे आणि 70 वर्षांपर्यंतचे भाविक या यात्रेवर जाऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...