आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ते म्हणाले, राज्यात दहशतवादी डोके वर काढत आहेत. यामुळे तिथे शांततेला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून लोकांचे हत्याकांड सुरु आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत मीडियासमोर काही फोटो आले होते, त्यात हाफिज सईद शीख दहशतवादी नेता गोपालसिंग चावलासोबत दिसत आहे.
विदेशी नागरीकांची चौकशी गरजेची
- मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले, गुप्तचर यंत्रणेला अधिक मजबूत करण्याबरोबरच कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, इटली आणि जर्मनी येथे भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांवरही कारवाई गरजेची आहे. विदेशात राहून हे लोक पंजाबविरोधात कारवाया करत आहेत.
- राज्यातील शांततेला आव्हान निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्टलाही आवर घालण्याची गरज कॅप्टन यांनी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.