आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रस नेत्या रम्या यांचे मोदींवर वादग्रस्त ट्विट, भाजपचा सवाल- राहुल गांधी कारवाई करणार का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ बंगळुरु - काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदन रम्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त ट्विट केले आहे. पंतप्रधानांनी बंगळुरु येथे शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या वक्तव्याचा त्यात उल्लेख केला आहे. भाजपने रम्या यांच्या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. ही असभ्य भाषा असून पंतप्रधानांचा अवमान करणारे वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सवाल केला आहे, की मणिशंकर अय्यर यांच्याप्रमाणे रम्या यांच्यावर कारवाई करणार का? नरेंद्र मोदींनी रविवारी जाहीर सभेतून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराने लोक वैतागले असल्याचे म्हटले होते. 

 

रम्या यांनी ट्विटमध्ये काय लिहिले 
- बंगळुरु येथील रॅलीमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले होते, फळ-भाज्यांचे उत्पादन करणारे शेतकरी आमच्या टॉप (TOP) प्रॉयोरिटीवर आहे. याचा अर्थ टोमॅटो, कांदा आणि बटाटे (टोमॅटो, ओनियन, पोटॅटो) उत्पादक. 
- काँग्रेस नेत्या रम्या यांनी मोदींच्या वक्तव्यावर ट्विट केले, 'तुम्ही (POT) नशेत असताना असे होते का?' रम्या यांनी मोदींचेही वक्तव्य ट्विट केले आहे. 

 

भाजपने घेतला आक्षेप 
- रम्या यांच्या ट्विटनंतर भाजपने आक्षेप घेतला आहे. पक्षाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हाराव यांनी ट्विट केले. ते म्हणाले, 'देशातील बहुते कलोक आणि आमच्या पक्षाचे नेत्यांनाही माहित नाही की तुम्ही हे कोणत्या संबंधाने म्हटले आहे? मात्र तुमच्या पक्षातील नेत्यांना ते लगेच लक्षात येईल. जेव्हा तुम्ही अशा मानहानीकारक कॉमेंट्स करता तेव्हा या नेत्यांना स्फुरण चढते.'

 

रम्या यांच्यावर कारवाई करणार का काँग्रेस? 
- भाजपने राष्ट्रीय आयटी हेट अमित मालवीय यांनी रम्या यांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. ते म्हणाले, 'कर्नाटकात 3500  पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही संख्या देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी बोलण्याचा अर्थ POT (नशेत) असण्यात होतो का.'

- दुसऱ्या ट्विटमध्ये मालवीय यांनी लिहिले,  'गुजरात निवडणुकीवेळी अभद्र कॉमेंट करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना जसे शांत केले तसे राहुल गांधी दिव्या स्पंदन यांना शांत करणार का.'

 

रम्या यांनी मालवीय यांना असे दिले स्पष्टीकरण 
- भाजच्या निशाण्यावर आल्यानंतर रम्या यांनी दुसरे ट्विट केले. त्यांनी लिहिले, 'तुम्ही तुमच्या ट्विटमध्ये मला टॅग करण्याची तसदी घेतली नाही. कारण तुम्हाला वाटले की तसे केले तर लोक (यूजर्स) माझ्या अकाऊंटवर पिन टॉप केलेले मोदींचे व्हिडिओ पाहातील. दुसरे हे की तुम्हाला POT चा अर्थ कळाला नही. त्याचा अर्थ होतो पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. तुम्ही काय विचार केला?'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भाजप-काँग्रेसचे ट्विटर वॉर 

बातम्या आणखी आहेत...